जुईली या चित्रपटाच्या माध्यमातून अविष्कार दारव्हेकर याने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. ह्या गोजिरवण्या घरात, आभाळमाया, दामिनी, कुटुंब, देवाशपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही, ती आणी इतर, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा चित्रपट आणि मालिका तसेच नाटकांचा तो एक महत्वाचा भाग बनला होता. भूतनाथ या बालनाट्याची त्याने सिरीज काढून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. अभिनयाचे बाळकडू त्याला त्याच्या घरातूनच मिळाले होते. अविष्कारचे आजोबा म्हणजे प्रसिद्ध नाट्यकर्मी “पुरुषोत्तम दारव्हेकर” हे नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचं पान म्हणून ओळखले जात.

कट्यार काळजात घुसली हे नाटक त्यांनी लिहून रंगभूमीवर आणलं होतं. याच नाटकावर आधारित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात आला होता. दिग्दर्शक आणि गीतकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. ‘रंजन कला मंदिर’ या नावाने त्यांनी स्वतःची नाट्यसंस्था उभारली होती. उपाशी राक्षस, मोरूचा मामा, पत्र्यांचा महल, आब्रा की डाब्रा , स्वर्गातील काळा बाजार, कट्यार काळजात घुसली या नाटकांची मेजवानी त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. तर अविष्कारचे वडील डॉ रंजन दारव्हेकर हे देखील नाट्यकर्मी म्हणून ओळखले जातात. एवढे असूनही कला सृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी अविष्कारने आपली पावले मुंबईकडे वळवली. एक दोन वर्षात फारसा जम न बसल्याने आर्थिक टंचाई वाटू लागली. एकदा महिन्याच्या एंडला खिशात दीडच रुपया होता त्यावेळी दादरला दीड रुपयात वडा पाव मिळायचा मी बांद्राला होतो पण दादरला जायचं म्हटलं तर ५ रुपये तिकीट होतं. त्यादिवशी खूप भूक लागली होती बोरिवली पर्यंतच तिकीट अगोदरच काढलं होत शेवटी हतबल होऊन देवाला प्रार्थना केली की आज मला उपाशी झोपवू नकोस.. अशी प्रार्थना करताच एक मित्र बसस्टॉपवर भेटला मला घरी घेऊन गेला आणि पोटभर जेवू घातलं.

या मुंबईने मला कधीच उपाशी ठेवलं नाही असं अविष्कार म्हणतो. चित्रपट मालिकेतील काम कमी झाल्यावर स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार केला. त्यामुळे लॉक डा’ऊन काळात दुकान अगोदरच होतं फक्त त्याला फूड कॉर्नर बनवायचं ठरवलं. ५० रुपयात चार चपाती बजाजी भात वरण अशी थाळी विकायचो त्याचे आता ७० रुपये केले आहेत असे तो म्हणतो. कुकिंगची आवड पाहिल्यासपासूनच होती त्यामुळे या व्यवसायाची गोडी अधिकच वाढली. दैवज्ञ पतपेढी, आर के वैद्य रोडवर दादर येथे Patils kitchen या नावाने तो स्वतःचे फूड कॉर्नर चालवत आहे. मटकी उसळ, ज्वारीची भाकरी, व्हेज कुर्मा, मसाला चहा अशा पदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक खवय्ये त्याच्या फूड कॉर्नरला भेट देतात. अविष्कार बिग बॉसच्या शो मुळे आता चांगलीच प्रसिद्धी मिळवून गेला आहे. भविष्यात चित्रपट आणि मालिकेतून तो पुन्हा एकदा त्याच जोमाने दिसावा अशी आशा आहे.