
‘बिग बॉस’ मराठीचे सध्या तिसरे पर्व सुरू आहे. पहिल्या दिवसापसूनच या घरामध्ये वादाला सुरुवात झाली. या सर्वांमध्ये आता पर्यंत अनेक स्पर्धकांनी या घराचा निरोप घेतला आहे. अशात या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागले आहे या विषयी जाणून घेऊ. ‘बिग बॉस’ चा संपूर्ण शो पाहण्याबरोबरच आठवड्याच्या शेवटी असलेली बिग बॉसची चावडी पाहायला रसिकप्रेक्षक कायमच उत्सुक असतात. या आठवड्यात चावडीवर सलमान खानची देखील एन्ट्री पाहायला मिळाली. अशात विकास आणि सोनाली हे दोघे सुरक्षित असून दादुस म्हणजेच संतोष चौधरी यांना बाद करण्यात आले आहे.

बिग बॉसच्या चावडीवर दर आठवड्याला कोणताही एक स्पर्धक बाद केला जातो. त्यामध्ये या वेळी दादूस यांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. दादूस बिग बॉसच्या घरामध्ये आल्या पासून अतिशय प्रामाणिक पने खेळत होते. एका टास्कमध्ये तर अक्षय वाघमारेला खराब जेवण बनवायचं होतं आणि दादुस यांना ते खायचं होतं. त्यावेळी त्यांनी एक क्षणही न थांबता ते जेवण संपवलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी एका टास्कमध्ये स्वतःच टक्कल देखील केलं होतं. त्यांच्या खेळा प्रमाणेच त्यांनी त्यांच्या गाण्यांनी देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अशात बिग बॉसच्या घरात ७० दिवस राहून बाहेर पडल्यावर महेश मांजरेकर यांच्याशी संवाद साधताना दादूस म्हणाले की, “या शोमध्ये खेळताना मला खूप आनंद झाला. बिग बॉसच्या संपूर्ण टीमने मला दिलेलं प्रेम हे मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल की, खरोखरच हा एक टॉप शो आहे.” अशात महेश मांजरेकर यांनी देखील दादुस यांच्या प्रामाणिक खेळाचे कौतुक केले. बिग बॉसच्या घरातून दादूस बाहेर पडला असला तरी तेथे अनेकांशी त्याची घट्ट मैत्री झाली आहे. पुढेदेखील तो सर्वांशी मैत्री निभावणार असल्याचं सांगतो.

बिगबॉस मध्ये खूप काही शिकायला मिळालं असल्याचं देखील दादूस बोलला. गोल्डमॅन म्हणून सर्वपरिचित असलेला दादूस म्हणजेच संतोष चौधरी दिलखुलास व्यक्तिमहत्व आहे. जेथे जाईल तेथे त्याची छवी उमटते. अनेक हॉटेल मध्ये मालवणी जेवण जेवतानाचे त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल देखील झाले आहेत. आगरी कोळी प्रेक्षक त्याला भरभरून साथ देताना पाहायला मिळतात. आता दादूस बिग बॉसच्या घरात नसला तरी बिग बॉसच्या खेळांना त्याने पसंती दर्शवली होती. बाहेर आपण बिग बॉसच्या खेळांना नावे ठेवतो पण बिग बॉसच्या घरातील वातावरण आपल्याला दिसतं तसं मुळीच नाही असं तो म्हणतो. काही दिवसांपूर्वी सोनाली आणि मीनलमध्ये भांडण झालं. त्यांनतर विकास आणि विशालमध्ये भांडण झालं. सोनाली आणि विशाल ह्यांमधे देखील दुरावा वाढताना पाहायला मिळतोय. पण पुढे हे चित्र बदलणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.