बिग बॉस च्या सिजन २ च्या पर्वात कवी मनाचे नेते म्हणून अभिजित बिचुकले यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आजवर केलेल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे त्यांनी अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. अभिजित बिचुकले हे मूळचे सातारा जिल्ह्यातले. नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीच्या पदासाठी त्यांनी प्रयत्न केले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत त्यांना यश आले नाही. खासदार उदयनराजे भोसले यांना खुलेआम आव्हान देणारा बिचुकले याच कारणामुळे नेहमी चर्चेत राहिला. ‘२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरणार’, ‘सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार’, ‘कवी मनाचा नेता’ अशी अनेक वक्त्यव्य त्याने केलेली पाहायला मिळतात. त्याचमुळे त्यांना बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून प्रवेश मिळाला होता.

बिग बॉसच्या घरात राहून त्यांनी त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. बिग बॉसच्या घरात असताना त्यांना चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती त्यावेळी बिचुकले प्रकरण खूप गाजलं होत. बिग बॉसच्या घरात त्यांची अभिनेत्री शिवानी सुर्वे सोबत चांगली मैत्री जुळली होती. अभिजित बिचुकले आता आणखी एका कारणामुळे प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी पुण्यात स्वतःचा सातारा कंदी पेढे विक्री व्यवसाय सुरू केला आहे. बिग बॉसच्या २ ऱ्या सिजनचा कंटेस्टंट पराग कान्हेरे याने नुकतीच ही बातमी कळवली आहे. साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार आहे. पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ त्यांनी हे कंदी पेढ्यांचे दुकान थाटले आहे. पराग कान्हेरेने बिचुकले यांना त्यांच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिचुकले’ यावेळी नाही चुकले ….असे म्हणून बिचुकले यांचे त्याने स्वागत आणि अभिनंदन केले आहे. अभिजित बिचुकले यांना त्यांच्या या व्यवसायाच्या भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा…