मराठी बिग बॉसचा ४ था सिजन लवकरच सुरू होणार आहे. या सिजनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसचा शो भांडण आणि प्रेमप्रकरण यामुळे नेहमीच हिट ठरला आहे. मराठी बिग बॉसमध्ये देखील असे किस्से घडलेले पाहायला मिळाले. हिंदी बिग बॉस तर अशाच किस्यांमुळे प्रसिद्धीस आला आहे. काही महिन्यांपूर्वी हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन पार पडला या शोमध्ये तेजस्वी प्रकाशने विजयाची ट्रॉफी जिंकली मात्र यात मराठी सेलिब्रिटी देखील हजेरी लावताना दिसले. मराठी, हिंदी चित्रपट अभिनेता राकेश बापट हा देखील या सिजनमध्ये सहभागी झाला होता.

बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टी सोबत त्याचे प्रेमाचे सूर जुळून आले होते. शो संपल्यानंतरही हे दोघे एकमेकांना डेट करत राहिले. राकेशने शमिताच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन थाटात केले होते. मात्र अवघ्या काही महिन्यातच या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे दिसून येते. राकेश बापटने स्वतः इन्स्टग्राम स्टोरीवर शमिता आणि माझ्यात आता कुठलेच नाते नाही हे स्पष्ट केले आहे. ‘शमिता आणि माझ्यात आता काहीच नाही. असामान्य परिस्थितीत नियतीने आमचे मार्ग बनवले . तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभार अमच्यावरचे तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या. ‘ असे म्हणत राकेशने शमितासोबत ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले आहे. राकेश सोबत शमिताने देखील इन्स्टग्राम स्टोरीवर आमचे नाते संपुष्टात आले असल्याचे म्हटले आहे. राकेश बापट हा मूळचा अमरावतीचा. तुम बिन या बॉलिवूड चित्रपटातून राकेश झळकला होता. या चित्रपटाने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. नुकतेच तुम बिन चित्रपटाला प्रदर्शित होऊन २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. वृंदावन, सविता दामोदर परांजपे या मराठी चित्रपटातून राकेशला मुख्य नायकाची भूमिका मिळाली. सात फेरे, मर्यादा, कबुल है अशा हिंदी मालिकेतुनही त्याने काम केले आहे.

२०११ साली रिधी डोगरा हिच्या सोबत तो विवाहबद्ध झाला होता मात्र २०१९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. बिग बॉसच्या घरात राकेश आणि शमिता शेट्टी एकत्र आले तेव्हा रिधीने काहीच विरोधी प्रतिक्रिया न देता ‘तो सर्वस्वी त्याचा निर्णय आहे ‘ असे म्हटले होते. खर तर राकेश बापट आणि शमिताने बोग बॉसच्या शोमध्ये हिट होण्यासाठीच हे प्रेमप्रकरण रचले असल्याचे म्हटले जात आहे. हा सर्व पब्लिसिटी स्टंट होता अशीच चर्चा आता सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळत आहे. बिगबॉस हिंदी असो किंवा मराठी बिगबॉसच्या घरात हे सगळं नेहमीच पाहायला मिळत. घरात आलेल्या मधील कोणाचं न कोणाचं प्रेम जुळून येत ह्यामुळेच लोकांना पाहायला मजा येते हि वस्तुस्तिथी आहे त्यामुळेच अश्या शो चा टीआरपी वाढतो हे सत्य नाकारता येत नाही. हे सर्व ह्या मागे हि घडताना पाहायला मिळालं आणि येणाऱ्या अनेक भागांमध्ये देखील हेच पाहायला मिळणार यात शंका नाही.