
गेल्या काही दिवसात मराठी सृष्टीतील कलाकारांची लगीनघाई जोरदार सुरू झालेली पाहायला मिळत आहे. १६ फेब्रुवारी रोजी ३ सेलिब्रिटींची लग्न थाटात पार पडली. दिव्या पुगावकर, अंकिता वालावलकर आणि सुकन्या काळण यांची लग्नाची लगबग तीन चार दिवस रंगली होती..ल अशातच आणखी एका सेलिब्रिटीने गुपचूप लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन तुम्हाला आठवत असेलच.
विशाल निकम या सिजनचा विजेता ठरला होता. या सिजनमध्ये मीनल शाह ही टॉप ५ सदस्यांमध्ये पाहायला मिळाली होती. नुकतेच मीनल शाहने तिच्या लग्नाची बातमी जाहीर केली आहे. आज मीनल शाह बॉयफ्रेंड तथागत पुरुषोत्तम सोबत लग्नबांधनात अडकली. गोव्यात हा लग्नसोहळा पार पडला. मीनल आणि तथागत पुरुषोत्तम गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मीनलने गोव्यात आलिशान घर बांधल होतं तेव्हाही तिचा हा बॉयफ्रेंड तिच्या सोबत असलेला पाहायला मिळाला. आज पार पडलेल्या त्यांच्या या लग्नाला अभिनेत्री सोनाली पाटील हिने हजेरी लावली होती. सोनाली आणि मीनल दोघींची ओळख बिग बॉस मुळेच झाली होती.

त्यामुळे खास मैत्रिणीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सोनाली गेले दोन दिवस तयारीत होती. मीनल आणि पुरुषोत्तम यांचे लग्न मराठमोळ्या पद्धतीने पार पडले..यावेळी मिनलने नऊवारी साडी नेसली होती. लग्नाचे काही खास क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर करताच तिच्यावर आता सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.