शिंदे घराण्याला संगीताचा वारसा लाभला आहे. प्रल्हाद शिंदे यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आनंद शिंदे आणि नातू तसेच पणतू अशा चार पिढ्यांनी गायन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. उत्कर्ष शिंदे पेशाने डॉक्टर असले तरी देखील त्याने गायन क्षेत्रात पाऊल टाकलेले पाहायला मिळाले. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनने उत्कर्ष शिंदेला लोकप्रियता मिळवून दिली या शोनंतर उत्कर्ष शिंदे व्हिडीओ सॉंगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता आणखी एका प्रोजेक्टसाठी त्यांनी काम सुरू केले आहे. त्यांची संपुर्ण टीम सोलापूर जिल्ह्यातील मारापूर या गावी शूटिंगसाठी गेली होती तिथे गेल्यावर एक प्रसंग घडला. या प्रसंगामुळे साक्षात माणसाच्या रूपातच देवाचे दर्शन झाले असे उत्कर्ष शिंदे यांनी म्हटले आहे. हा अनुभव नेमका काय होता ते त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात…माणसात देव असतो ऐकलं होत काल देवाच दर्शन घडल.”

शूटिंग साठी आम्ही मंगळवेढे माझ्या गावा नजीक मारापूर येथे शूट करत होतो.संध्याकाळ झाली,सूर्य प्रकाश मंदावला होता .आऊटडोर म्हंटलं कि चाहते आलेच सर्वाना भेटून सर्व सांभाळत शूट सुरु होत आणि त्यातच पाऊस धो धो पडू लागला .कॅमेरा ,ड्रोन ,गिम्बल पावसात कसबस सांभाळत पॅक अप केलं .परत रिसॉर्ट वर पोहोचलो आणि सर्वाना ओढ लागली मुंबई परतीची .सर्वजण बॅगपॅक करतच होतो कि कानी आवाज पडला “सर कॆमेराची लेन्सकिट कुठे सापडत नाहीये.सर्वांची शोधा शोध सुरु झाली.2 लाखाच्या लेंस ची किट कोणालाच सापडत न्हवता.9:30झाले.अंधारात परत लोकेशन च्या ठिकाणी जाऊन काही टॉर्च मारत तर काहीनि गाड्या ब्यागा 4-4वेळेस झटकून पाहिल्या.केमेरा,प्रॉडक्शंन,अससिस्टन्ट टिम ,ते स्पॉट बॉय तर रडायलाच लागले .लेंस कुठेच सापडेना.मग अखेरीस मी शकलं लढवली दोघांना घेऊन लोकेशन कडे निघालो.खेडंगाव असल्या मुळे क्वचित घरं आणि जी गर्दी शूट बघायला आली होती ती त्याच घरांन पैकी असावी असा अंदाज लावला .म्हंटलं हा परियाय वापरून बघावा.मग एका घरा कडे पोहोचलो.माझ्या टिम मधील दोघे त्या घरा कडे जाऊन विचारपूस करू लागले गेले .”तुमच्या पैकी कोणी त्या तिथे शूटिंग सुरु असताना होते का किंवा कोणाला काही वस्तू सापडल्या का ?असे विचारतच होते.कि एक शेतकरी मुलगा चिखलातून वाट काढत समोर आला आणि म्हणाला “तुम्ही शूटिंग वाले का ?”. मी झाडाखाली थांबून शूटिंग बघत होतो तिथे उत्कर्ष शिंदेंना पाहिलं .साहेब तुमची एक वस्तू तिकडेच विसरली वाटतं .ती मी माझ्या कडे जपून ठेवली आहे .

माझा एक मित्र उत्कर्ष शिंदेंचे फोटो रोज स्टेट्स ला ठेवत असतो मी त्याला संपर्क केला .काही संपर्क सापडतोय का बघायला म्हणजे तुमची वस्तू पोहोचवता आली असती.आता तुम्हीच आलात तर तुमची वस्तू घेऊन जावा.शिंदें साहेबानची भेट होईल का? मी त्यांचा चाहता आहे अस म्हणताच,माझी टिम तडक त्याला माझ्या कडे घेऊन आलली .घडलेला प्रकार मला सविस्तर सांगितलं.मी त्याला त्याचे नाव विचारले ,म्हणाला सोमनाथ नराळे मी हि मग गळा भेट घेत ,त्याचा कौतुक केलं जाता जाता त्याच्या सोबत फोटो हि काढले.लाखोंची केमेरा लेंस परत सापडली म्हणून माझी टिम आनंदाने नाचत होती .तर तो बिचारा मला भेटला म्हणून किती खुश झाला.आणि मी मात्र सुनं झालो,विचारात पडलो .ह्या दोघांन पैकी कोणाचा आनंद मोठा ?. टिमचा कि मला भेटला म्हणून त्या शेतकऱ्याचा ?इमानदारी ,निखळ प्रेम ,थोर संस्कार.काल त्या गरीब शेतकरी मुलात मी सर्वात श्रीमंत व्यक्ती पाहिला .माणसात देव असतो ऐकलं होत काल देवाच दर्शन घडल.