
पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोचलेली अर्चना म्हणजेच अभिनेत्री अंकिता लोखंडे. लहानपणापासून च अभिनेत्री होण्याचं तीच स्वप्न होत. झी सिने स्टार कि खोज मध्ये अंकिताने एक स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाने टेली इंडस्ट्रीला अनेक कलाकार मिळवून दिले, त्यापैकीच एक म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिताने हा शो जिंकला नाही. पण या कार्यक्रमातून सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यात अंकिता यशस्वी राहिली. अंकिताकडे पवित्र रिश्ता च्या माध्यमातून मोठी संधी चालून आली. या संधीचं अंकिताने सोनं केलं आणि अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे घराघरात ओळखली जाऊ लागली.याच दरम्यान अंकिता ने झलक दिखलाजा, कॉमेडी सर्कस आणि एक थी नायिका मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता.

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने फक्त टीव्ही जगतातच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. अंकिता लोखंडेचे लाखो चाहते आहेत. अंकिता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियावरून अंकिता कायम आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. सुशांत सिंह राजपूतसोबतच अफेअर आणि नंतर ब्रेकअप असो किंवा आता विकी जैनसोबत असलेलं नातं अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. मात्र आता ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्याचे दिसून येत आहे. बिग बॉस चा 15 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचे म्हंटले जात आहे. आणि ह्याच शो साठी अंकिता लोखंडेला विचारणा करण्यात आल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. परंतु आता अंकिता ने स्वतःच ह्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ती ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये अशा बातम्या येऊ लागल्या आहेत की मी यावर्षी ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी होणार आहे. मला वाटतं मीडिया आणि सर्वांनी हे नोट करावं की मी बिग बॉस या शोमध्ये सामील होणार नाही. या शोमध्ये मी सहभाग घेणार असल्याचं वृत्त खोटं आहे.

मी अशा कोणत्याच गोष्टीचा भाग होणार नसतानाही लोकांनी लगेचच घाई करत मला व्देषपूर्ण प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय.” असं अंकिता तिच्या पोस्टमध्ये म्हणालीय. गेल्या वर्ष भरापासून ‘बिग बॉस १५’मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यामुळे सोशल मीडियावरून अनेक नेटकऱ्यांनी अंकितावर निशाणा देखील साधला होता. दरम्यान अंकिता लोखंडे निर्माती एकता कपूरसोबत सध्या ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेच्या सिक्वलवर काम करतेय. या शोचं स्क्रीप्ट जवळपास तयार असून हा शो ओटीटीवर प्रसारित होणार आहे. तर या शोमध्ये अर्चनाची भूमिका अंकिता लोखंडेच साकारणार आहे. अंकिता लोखंडे हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा …