मराठी बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनमुळे आविष्कार दारव्हेकर चर्चेत आला होता. अविष्कारची पूर्वाश्रमीची पत्नी स्नेहा वाघ हिने देखील या शोमध्ये सहभाग दर्शवल्याने या चर्चा अधिक रंगवल्या जाऊ लागल्या होत्या. बिग बॉसच्या घरात येण्याअगोदर गेल्या काही वर्षांपासून आविष्कार अभिनय क्षेत्रापासून दूर होता त्यातच महामारीचा काळ आल्यामुळे त्याचं शरीराकडे दुर्लक्ष झालं होतं. पण ह्याच काळात त्याने एक अनोखा उपक्रम देखील राबवला. दादर येथे स्वतःचे ‘पाटीलज किचन’ या नावाने त्याने फूड कॉर्नर सुरू केला. खाणे आणि इतरांना खायला घालणे त्याच्या आवडीचे काम होते त्यातून गरीब आणि गरजू लोकांना पोटभर अन्न पुरवण्याचे मोलाचे काम तो करत होता.

अविष्कारला बिग बॉसच्या घरातून खूप लवकर बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर तो सोशल मिडियापासून काहीसा दूर झाला होता. नुकतेच स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अविष्कारने आपल्या दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावरून अविष्कारने पुन्हा एकदा लग्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आविष्कार त्याच्या पत्नीसोबत ट्रिप एन्जॉय करत आहे. अविष्कारच्या या दुसऱ्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. स्नेहा वाघने अविष्कारच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा बिग बॉसच्या घरात काढली होती. ‘मला दुसऱ्या लग्नाला नक्की बोलव ‘ असे तिने अविष्कारला निरोप देताना म्हटले होते. स्नेहा वाघ आणि अविष्कार बिग बॉसच्या घरात आल्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र येतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना होती. मात्र पुन्हा एकत्र येण्यावर स्नेहाने तटस्थ भूमिका घेतली होती. या निर्णयाबाबत ती म्हणाली होती की, ‘माझं अविष्कारासोबत खूपच कमी वयात लग्न झालं होत. काहीही कारण काढून तो मला मारहाण करायचा. माझ्या चेहऱ्यावर त्यांनी मारहाण केल्याचे वन देखील अनेकांनी पाहिलेत. सगळ्यांना त्यातलं सगळं माहित आहे पण कोणीही काही बोलत नव्हतं. सकाळी मी अर्धमेल्या अवस्थेत तशीच सेटवर जायचे. सेटवरील लोकांनाही सर्वकाही माहित झालेलं.

माझी हि झालेली अवस्था तेथिल लोकांना पाहवत नव्हती. सेटवरील लोक त्यावेळी मला खूप समजून घायचे मला वेळ द्यायचे. सेटवर माझं मन रमायचं पण संध्याकाळ झाली कि मला भीती वाटायची. घरी गेल्यावर आता अविष्कार माझ्यासोबत आणखीन काय करेल ह्या भीतीने मला घरी जायची भीती वाटायची. आविष्काराने मला खूपच त्रास दिलाय. मी त्याने दिलेला त्रास कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी अवघ्या १७ वर्षांची होते. मी आविष्काराच्या घरातून पळून माझ्या घरी गेली होते. आता मी त्याचा विचार देखील करू शकत नाही. मी पुन्हा त्याच्याकडे परतेन किंवा आमच्यात पुन्हा काही घडेल अशी तिळमात्रही आशा कोणी बाळगू नये’. तूर्तास आविष्कार पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे. या बातमीने मराठी सेलिब्रिटींनाच नव्हे तर त्याच्या चाहत्यांना देखील सुखद धक्काच बसला आहे.