
झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत होळी का साजरी केली जाते त्याचे कथानक दर्शवले जात आहे. भक्त प्रल्हाद आणि त्याची देवावरील भक्ती त्याचे वडील हिरण्यकश्यपू कशा पद्धतीने हणून पाडतो तसेच हिरण्यकश्यपूची बहीण होलिका आपल्या भावाला कशाप्रकारे साथ देते हे पाहणे आता रंजक होताना दिसत आहे. आज मालिकेतील भक्त प्रल्हाद साकारणाऱ्या बालकलाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… भक्त प्रल्हादाची भूमिका “जयेश शिवाजी भोर” या बालकलाकाराने साकारली आहे. जयेशचे कुटुंब मूळचे नाशिकचे परंतु सध्या ते ठाण्यातच वास्तव्यास आहेत.

जयेशने या मालिकेअगोदर अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून जयेशने बाल संभाजींची भूमिका साकारली होती. याशिवाय स्टार प्रवाहवरील तुझ्या इश्काचा नाद खुळा, अँड टीव्ही वरील एक महानायक डॉ बी आर आंबेडकर , झी टीव्ही वरील ब्रह्मराक्षस २ अशा हिंदी मराठी मालिका त्याने अभिनित केल्या आहेत. घेतला वसा टाकू नको ही त्याने अभिनित केलेली अध्यात्मिक मालिका. मालिकेमुळे त्याच्या बोलण्यातील सौम्यपणा आणि उठावदारपणा खूपच भाव खाऊन जाताना दिसतो याच कारणामुळे भक्त प्रल्हाद ही भूमिका कोण साकारतोय याबाबत कुतूहल निर्माण होताना दिसते. प्रेक्षकांमध्येही ही भूमिका कोण साकारत आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. जयेशने शालेय जीवनातही सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवलेला पाहायला मिळतो. अभिनयाची त्याची आवड मालिकेच्या माध्यमातून दिसून येतेच. लवकरच त्याची व्यावसायिक जाहिरात देखील टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे समीर चौगुलेसोबत तो एका जाहिरातीतून झळकणार आहे आणि यापुढेही त्याला मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून चांगल्या भूमिका मिळत राहोत हीच एक सदिच्छा…तुर्तास घेतला वसा टाकू नको मालिकेतील त्याने साकारलेला भक्त प्रल्हाद प्रेक्षकांना खूपच आवडला आहे त्याबाबत त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…