‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतून सौम्या टंडन खूप चर्चेत आली. मालिकेतील तिचा अभिनय पाहता ती घरघरात पोहचली. अशातच तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिने हा निर्णय का घेतला? मालिकेत काम करत असताना तिला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करू लागले. नको नको त्या प्रश्नांना कंटाळून शेवटी चाहत्यांच्या मनातील हा संभ्रम आणि अफवा दूर करण्यासाठी तिने स्वतःचं मत आता स्पष्ट केलं आहे.

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील अभिनेत्री सौम्या टंडनने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामधून तिने सांगितलं आहे की, “मला वेगवेगळी आव्हान स्वीकारायला आवडत. या मालिकेतील माझा प्रवास खूप छान होता. इथे मला खूप चांगली माणसे भेटली. ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले.” काही दिवसांपूर्वी अंगुरी भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने ही मालिका सोडली . त्यावेळी ती मालिकेच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचं समोर आलं होतं. अशात सौम्याने देखील याच कारणामुळे मालिका सोडली असावी असा अनेकांचा समज झाला होता. मात्र यावर देखील अभिनेत्रीने स्वतःचं मत दिलं आहे. तिने सांगितलं आहे की, “माझ्या विषयी सुरू आलेली ही चर्चा पाहून मला खूप वाईट वाटलं. मात्र मी ही मालिका कुणावर नाराज होऊन सोडलेली नाही, तर मला आणखीन काहीतरी नवीन करायचे आहे त्यामुळे सोडली आहे. प्रसिद्धीसाठी सतत स्क्रीनवर दिसणे माझ्यासाठी फार महत्वाचे नाही.” असं देखील ती म्हणाली.

सौम्याने साल २००६ मध्ये ऐसा देस है मेरा या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर तिने सास वर्सेस बहू, अशा अनेक मालिकांमध्ये दमदार अभिनय केला. तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. २००७ साली आलेला चित्रपट जब वी मेटमध्ये तिने करीनाच्या बहिणीची म्हणजेच रूपची भूमिका साकारली होती. इथे देखील तिचं मोठं कौतुक झालं. २०११ साली वेलकम टू पंजाब या चित्रपटामध्ये देखील तिने अभिनय केला होता. आता मनोरंजन विश्वातील फक्त अभिनय नाही तर आणखीन वेगवेगळ्या शैलीतून तिला प्रकाश झोतात यायचं आहे आणि त्यासाठी तिचे अथक परिश्रम व प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणजे भाभी जी घर पर है या मलिकेलितील तिची एक्झीट. तिच्या जागी या मालिकेत अभिनेत्री नेहा पेंडसे पाहायला मिळालीत्यामुळे हि मालिका अभिनेत्री सौम्या टंडनने का सोडली असा प्रश्न प्रेक्षकांना भेडसावत होता.