कलर्स मराठीवर नुकतीच ‘बायको अशी हव्वी’ ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत जान्हवी आणि विभासचे प्रमुख पात्र साकारले आहे अभिनेत्री गौरी देशपांडे आणि विकास पाटील यांनी. नागेश मोरवेकर यांच्या आवाजातील मालिकेचे टायटल सॉंग नेहमीप्रमाणेच भाव खाऊन जाताना दिसते या मालिकेतून ते जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकत आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी विभासच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. प्रदीप वेलणकर यांनी अनेक चरित्र भूमिका साकारल्या आहेत परंतु पहिल्यांदाच त्यांनी या मालिकेत विरोधी भूमिका साकारलेली पाहायला मिळत आहे.

घरातल्या महिलांनी चौकटी बाहेर जाऊ नये अशी विचारसरणी असलेले विभासचे वडील त्यांनी आपल्या अभिनयातून चोख बजावले आहेत. आज ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… प्रदीप वेलणकर हे मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्य अभिनेते म्हणून ओळखले जातात. एक गाडी बाकी अनाडी, ठाकरे, पेज 3, आभास, चकवा, बकेट लिस्ट, असंभव, या गोजिरवाण्या घरात अशा बॉलिवूड आणि मराठी सृष्टीतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम ही प्रदीप वेलणकर यांची मुलगी आहे. आपल्या वडीलांप्रमाणे मधुराने देखील हिंदी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ज जंतरम म मंतरम या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका तिने साकारली होती तर हापूस, गोजिरी, सरीवर सरी, मातीच्या चुली, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, अशाच एका बेटावर अशा चित्रपटातून ती नेहमीच प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली. सरी वर सरी मधील भूमिकेसाठी संस्कृती कलादर्पणचा पुरस्कार तिने पटकावला आहे.

याशिवाय अधांतरी आणि नॉट ओन्ली मिसेस राऊत मधील भूमिकेसाठी तिला विशेष अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला आहे. मधुरा एक उत्तम लेखिका देखील आहे. ‘मधुरव’ अंतर्गत मराठी भाषेवर आधारित अनेक पुस्तकांचे लेखन तिने केले आहे. अभिनेता, दिग्दर्शक अभिजित साटम हा मधुराचा नवरा आहे. अभिजित सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मात्र इंजिनिअर असूनही अभिजितने हत्यार, तेरा मेरा साथ रहे या हिंदी चित्रपटातून त्याने अभिनय देखील साकारला आहे. तसेच काही मराठी चित्रपट त्याने दिग्दर्शीत केले आहेत. सीआयडी फेम एसीपी प्रद्युमन म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम हे मधुराचे सासरे आहेत. मधुरा आणि अभिजित यांना युवान नावाचा मुलगा आहे युवान खूप क्युट दिसत असून भविष्यात तो देखील कलाक्षेत्रात उतरल्यास वावगे ठरायला नको. घरातील सगळेच सदस्य उत्तम अभिनेते असले तरी कुणालाही त्या गोष्टीचा गर्व झालेला दिसून येत नाही. अगदी सर्वसामान्य कलाकरांप्रमाणेच सेटवर ते वागत असलेलं अनेक कलाकारांच्या तोंडून नेहमीच ऐकायला मिळत. अभिनेते प्रदीप वेलणकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…