Breaking News
Home / मराठी तडका / “बायको अशी हव्वी” मालिकेतील हि सुंदर अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

“बायको अशी हव्वी” मालिकेतील हि सुंदर अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

कलर्स मराठीवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. आज म्हणजेच १७ मे २०२१ या तारखेपासून ८.३० वाजता “बायको अशी हव्वी” ही नवी कौटुंबिक मालिका कलर्स वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत गौरी देशपांडे हि नवखी अभिनेत्री तर अभिनेता विकास पाटील प्रमुख भूमिकेतपहायला मिळणार आहेत. गौरी देशपांडे हिची हि पहिलीच टीव्ही मालिका असली तरी तुम्ही तिला ह्यापूर्वी देखील मराठी चित्रपटात पाहिलं असेलच. गौरी देशपांडे हिच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात…

actress hauri deshpande
actress hauri deshpande

“बायको अशी हव्वी” या मालिकेत अभिनेत्री गौरी देशपांडे हिने जान्हवी हे पात्र साकारले आहे. तर विकास पाटील ने विभासचे पात्र साकारले आहे. ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन-दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेचे कथानक विभास आणि जान्हवी भोवती गुरफटले असल्याने नव्या विचारांची जान्हवी विभासच्या बुरसटलेल्या विचारपद्धतीला कशी बळी पडते आणि त्यातून ती मार्ग कसा शोधते यावर आधारित असणार आहे. जान्हवीचे दमदार पात्र साकारणाऱ्या गौरी देशपांडे बद्दल या काही खास गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत नसतील. गौरी हि मुंबईतच लहानाची मोठी झाली तिचे शिक्षण देखील मुंबईत झाले. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्कुल अँड कॉलेज मधून तिने शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने Audiologist and Speech Language Pathologist केलं. ती एक उत्तम निवेदक देखील आहे अनेक मंचावरून तिने अभिवाचनाचे सादरीकरण केले आहे. या प्रवासात डॉ वंदना ताई बोकील यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन तिला मिळाले आहे.

bayko ashi havi serial actress
bayko ashi havi serial actress

“अशी बायको हव्वी” या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. याअगोदर २०१५ साली ‘बाबांची शाळा’ या चित्रपटात तिने काम केल होत. याच बरोबर “मोगरा” या ऑनलाइन नाटकातही ती झळकली आहे. गौरीला डान्सची देखील विशेष आवड आहे सोबतच तिने मॉडेलिंग ही केले आहे. कवितांची तिला विशेष गोडी आहे अनेकदा आपल्या इंस्टाग्रामवरून ती वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण करताना दिसते. बायको अशी हव्वी ही मालिका इतर मालिका पेक्षा जरा वेगळी पहायला मिळणार आहे नव्या विचारांची जान्हवी ही नवऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करणारी असेल की स्वतःची स्वप्ने पूर्ण करणारी असेल ? हे काही भागातच स्पष्ट होईल मात्र प्रेक्षकांना ती कितपत आवडणार हे देखील येत्या काही दिवसांतच अधिक स्पष्ट होईल. तुर्तास या पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त नवोदित अभिनेत्री गौरी देशपांडे हिला आणि बायको अशी हव्वी ह्या मालिकेच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *