कलर्स मराठी वाहिनीवर ‘बायको अशी हवी’ ही मालिका रात्री ९.३० वाजता प्रक्षेपित केली जात होती. या मालिकेत विकास पाटील आणि गौरी देशपांडे विभास आणि गौरी ची भूमिका साकारताना दिसत होते. मालिकेत विभासचे पात्र काहीसे विरोधी भूमिका दर्शवणारे होते त्याच्या स्वभावगुणामुळे जान्हवीसोबत त्याचे नाते आता अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेतली ही जोडी आता एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहे. गौरी देशपांडे हिची हि पहिलीच टीव्ही मालिका असली तरी तुम्ही तिला ह्यापूर्वी देखील मराठी चित्रपटात पाहिलं असेलच.

गौरी हि मुंबईतच लहानाची मोठी झाली तिचे शिक्षण देखील मुंबईत झाले. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्कुल अँड कॉलेज मधून तिने शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने Audiologist and Speech Language Pathologist केलं. ती एक उत्तम निवेदक देखील आहे अनेक मंचावरून तिने अभिवाचनाचे सादरीकरण केले आहे. या प्रवासात डॉ वंदना ताई बोकील यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन तिला मिळाले आहे. बायको अशी हवी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार केला होता. मालिकेला मिळालेला अल्पसा प्रतिसाद आणि बिग बॉस च्या ३ ऱ्या सिजनच्या अगमनामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेला सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता पण नंतर प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली त्यामुळे मालिकेचा टीआरपी चांगलाच घसरला. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. शेवटचे शूट असे म्हणून या मालिकेतील सर्वच कलाकार भावुक झालेले पाहायला मिळाले. मालिकेतली जान्हवी म्हणजेच अभिनेत्री गौरी देशपांडे हिने देखील एक भावनिक पोस्ट लिहून प्रेक्षक आणि सहकलाकारांचे धन्यवाद मानले आहेत.