बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील तात्याची आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणार आहे या भूमिकेने अक्षय टाकला अमाप लोकप्रियता मिळऊन दिली होती. या मालिकेनंतर अक्षयने आणखी काही मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. बायको अशी हवी, संत गजानन शेगावीचे या मालिकेतून त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. अक्षय टाक हा मूळचा पैठणीचा शालेय शिक्षणासोबतच त्याला अभिनयाची आवड होती. त्यासाठी सरस्वती भुवन नाट्यशास्त्र विभागातून त्याने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली पुढे मुंबई युनिव्हर्सिटीमधून लोककला अकॅडमीमध्ये सहभाग दर्शवला.

नाट्यस्पर्धा , एकांकिका असा त्याचा प्रवास चालू असतानाच मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील तात्याच्या भूमिकेने अक्षय प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. याच मालिकेत काम करत असताना निकिता बुरांडे सोबत अक्षय विवाहबद्ध झाला होता. आता अक्षय त्याची पत्नी निकिता सोबत एकाच मालिकेतून झळकताना दिसत आहे. निकिता देखील अभिनेत्री आहे. सन मराठीवरील संत गजानन शेगावीचे या मालिकेतून तिचे छोट्या पडद्यावर पदार्पण झाले आहे. या मालिकेतून ती राधाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यामुळे अक्षय आणि निकिता एकाच मालिकेत सक्रिय असलेले पाहायला मिळत आहेत. नवीन सुरुवात असे म्हणत निकीताने मालिकेतील आपल्या भूमिकेबाबत सांगीतले आहे. पदार्पणातील पहिलीच मालिका त्यामुळे निकिता आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे. अक्षयच्या बिनधास्तपणामुळे सेटवर निकिता देखील मनमोकळेपणाने वावरताना दिसते.

k
एखाद्या मालिकेत पती पत्नी एकत्रित काम करण्याची हि पहिली वेळ नाही या आधी देखील अनेक मराठी कलाकारांच्या जोड्यांची एकत्रित वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत हे दोघं पती पत्नीच्या भूमिकेत नसले तरी दोघांचे एकत्रित सिन झालेले पाहायला मिळणार आहेत. मालिकेत नुकतीच राधाची एन्ट्री झाली आहे. चंदू आणि राधाला गजानन महाराज प्रसन्न होतात आणि त्यांची आर्थिक चणचण दूर करतात. आमच्या एक तासाच्या विशेष भागात गजानन महाराजांच्या चमत्काराची प्रचिती या दोघांना अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे आजच्या विशेष भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेनंतर निकिताला पुढे आणखी मालिकेत झळकण्याची संधी मिळो हीच एक सदिच्छा. तिच्या अभिनयाच्या या पदार्पणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!