“बचपन का प्यार” तुफान प्रसिद्ध झालेल्या गाण्याचा गायक लहानगा सहदेव याचा मंगळवारी मोठा अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. एसपी सुनील शर्मा आणि जिल्हाधिकारी विनीत नंदनवार सहदेवला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आणि सहदेवची प्रकृती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर सहदेवला जगदलपूरला हलवण्यात आलं. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बचपन का प्यार फेम सहदेव हे मित्रांसह दुचाकीवरून शबरी नगरच्या दिशेने जात होते. त्यानंतर अचानक रस्त्यावरील वाळूमुळे त्यांची गाडी घसरून पलटी झाली आणि त्यात त्याला गंभीर दुखापत झाली असल्याचं दिसून येत. सहदेव काही महिन्यापासून सोशिअल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. खरंतर त्याने हे गाणं खूप आधीच गायलं होत पण सोशिअल मीडियावर काही लोकांनी हे गाणं चांगलंच उचलून धरलं. मग काय अनेक अभिनेते अभिनेत्रींनी देखील त्याची स्थुती केली आणि त्यावर अनेक मिम्स देखील बनले. बॉलीवुड सिंगर बादशाह ह्याने त्याला एका अल्बम मध्ये गाण्याची संधी दिली त्यामुळे ते गाणं आणखीनच हिट झालं. काही दिवसांपूर्वीच सहदेव ह्याने स्वतःची कार देखील खरेदी केली होती. सव काही सुरळीत चाललं असतानाच हि धक्कादायक घटना घडल्याने त्याच्या परिवारातील लोकांना देखील मोठा धक्का बसला आहे. गरीब घरातील मुलगा प्रगती करतो हे पाहून अनेकांनी त्याला प्रोत्साहित केलं होत. सहदेव लवकरात लवकर बरा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…