आज १४ नोव्हेंबर २०२१ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वकपचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० मिनीटांनी पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवून अंतिम सामन्यात धडक मारली तर न्यूझीलंडने इंग्लंडला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सोशिअल मीडियावर ऑस्ट्रेलिया जिंकणार कि न्यूझीलंड अशी चर्चा सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच कारण देखील तसच आहे. भारतीय वंशाची विनी रमण ह्या महिलेने नुकतंच ह्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला आणि खास करून ग्लेन मॅक्सवेल ह्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आता हि विनी रमण आहे तरी असा सवाल तुम्हाला पडला असेल तिच्या बद्दल जाणून घेऊयात…

विनी रमण हि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे वास्तव्यास आहे. एक फार्मसिस्ट म्हणून ती तिथे कार्यरत असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण ह्यांचा साखरपुडा देखील झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण ह्यांचे कुटुंब एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. ग्लेन मॅक्सवेल यांच्या कुटुंबियांना भारतीय रूढी आणि परंपरा यांच विशेष आकर्षण आहे. भारतीय एकत्र प्रद्धती त्यांना खूप आवडती. त्यांचं कुटुंब देखील खूप मोठं असल्याचं ते बोलतात. साखरपुड्याच्या सोहळ्यात देखील त्यांनी भारतीय पोषाख परिधान करणे पसंत केलेले पाहायला मिळाले. २०१९ साली मॅक्सवेलने विनीला ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड सोहळ्यात नेले होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी युरोप ट्रिप केली होती. हे दिघेही आपल्या इन्स्टाग्रामवरून एकत्र असलेले फोटो नेहमी शेअर करताना दिसतात. २०१९ साली मॅक्सवेल क्रिकेट पासून थोडासा बाजूला राहिला होता त्याच्या गर्लफ्रेंडमुळेच त्याचे मानसिक संतुलन ढासळले अशी त्यावेळी चर्चा होती. मात्र या बातमीत कुठलेच तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते उलट विनीने मला त्या कठीण काळात खूप साथ दिली होती, मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी मला तिने खूप आधार दिला होता असं तो म्हणाला होता.

मॅक्सवेल आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळला. पण त्याला विशेष काही करता आलं नाही. आयपीएल सामन्यात आरसीबी टीमला आलेल्या अपयशामुळे खेळाडूंना ट्रोल करण्यात आले होते यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. मॅक्सवेल आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळला पण त्यांना यश आले नाही असं त्यांनी नमूद केलं होत. तिच्याचमुळे मी ह्या कठीण काळातून स्वतःला सावरू शकलो होतो असे तो त्यावेळी म्हणाला होता. ग्ले मॅक्सवेल आणि विनी हे दोघे २०१७ सालापासून एकमेकाना डेट करत आहेत. १४ ऑक्टोबर ह्या दिवशी ग्लेन मॅक्सवेल ह्याचा वाढदिवस होता त्यादिवशी विनी रमण हिने तिच्या सोशल अकाऊंटवरून मॅक्सवेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यात तिने म्हटले आहे की २०२२ हे साल आपलं असणार आहे. त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाची बातमी आता निश्चित झाली आहे. येत्या काही महिन्यातच दोघे लग्न करणार असल्याचं देखील बोललं जातंय. कदाचित ह्या टी२० विश्वकप नंतर ह्या दोघांची लग्नाची तारीख देखील ठरलेली पाहायला मिळेल असं चित्र दिसतंय. असो टी२० विश्वकप सामन्यासाठी ग्लेन मॅक्सवेल ह्याला खूप खूप शुभेच्छा…