Breaking News
Home / जरा हटके / सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणणारया ऑस्ट्रेलियन फिरकीचा जादूगार शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणणारया ऑस्ट्रेलियन फिरकीचा जादूगार शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास

जगाच्या क्रिकेटविश्वाला धक्का देणारी दुखद घटना आज घडली. क्रिकेट वर्तृळात महान फिरकी गोलंदाज अशी ख्याती मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेर्न वॉर्न याचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या शेन थायलंडमधील व्हिलामध्ये तो बेशुध्दावस्थेत आढळून आला. उपचारापूर्वीच शेन वॉर्नने अखरेच्या श्वास घेतला. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन टीमने ही अधिकृत माहिती देताच जगभरातील क्रिकेटविश्वातील शेनवार्नप्रेमीसमोर त्याच्या क्रिकेटमैदानावरील गोलंदाजीचा प्रवास तरळला. शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

shane warne bowler
shane warne bowler

कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्त झाल्यानंतर, वॉर्नला क्रिकेट खेळणाऱ्या महान गोलंदाजांपैकी एक म्हणून आजही ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानात जरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजच्या रूपात शेन वॉर्न भारतीय क्रिकेट संघासमोर कटटर प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकत असला तरी स्पर्धक खेळाडूंच्या खेळाचे कौतुक करण्यातील खिलाडूवृत्ती शेनमध्ये ठासून भरल्याचा अनुभव जगभरातील अनेक देशांच्या संघातील खेळाडूनी घेतली आहे. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला तर शेन वॉर्न क्रिकेटचा देव म्हणायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने वाढदिवशी शतक ठोकले ते शेन वॉर्नच्या गोलंदाजीची धुलाई करतच. सचिनच्या स्कोरबोर्डवर 100 आकडा झळकताच शेनवॉर्नने सचिनचा ऑटोग्राफ घेतला होता. तर शारजाहमधील तिरंगी मालिकेत भारत जिंकला तेव्हा आपला शर्ट काढून शेन वॉर्नने त्या शर्टवर सचिनल सही करायला भाग पाडले होते. अशा अनेक घटना व प्रसंगांमुळे शेन वॉर्न आणि भारतीय क्रिकेटची एक वेगळी नाळ जुळली आहे. क्रिकेट इतिहासात महान गोलंदाज ही ओळख मिळवणारया शेन वॉर्न याच्या नसानसात क्रिकेट होते. 1992 ला शेन याने त्याची पहिली कसोटी मॅच खेळली. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर वेगवान फिरकी गोलंदाज म्हणून त्याने नाव कमावले. एक हजारांहून अधिक सामन्यांमध्ये शेन याने 708 बळी घेण्याचा यशस्वी आलेख रचला आहे. गोलंदाजबरोबरच शेन संघातील पाचनंतरच्या क्रमांकावर खेळणारा फलंदाजही होता.

cricketer shane warne
cricketer shane warne

क्रिकेट कारकीर्दीत शेन वॉर्नने तीन हजारहून अधिक धावा काढण्यात बाजी मारली मात्र त्याला कधीच शतक करता आलं नाही. एकीकडे क्रिकेट मैदानावर आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना हैराण करणारया शेन वॉर्नला काही वादग्रस्त घटनांमुळे त्रासही झाला. उत्तेजन पदार्थ घेण्याच्या तपासणीत तो दोषी ठरला तर सटटेबाजी प्रकरणातही पैसे घेतल्याच्या आरोपामुळे त्याच्यावर बदनामीचा डाग लागला. 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्द इंग्लंड च्या सामन्यानंतर त्याने निवृत्ती घेतली. 2008 मध्ये आयपीएल च्या राजस्थान रॉयल्स या टीमच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतही शेन वॉर्न दिसला. 1993 पासून ते 2005 पर्यंत शेनवॉर्नने 194 सामने खेळून 293 बळी घेण्यात बाजी मारली. 1999 च्या क्रिकेट विश्वकपच्या विजेतेपदावर नाव कोरण्यात शेन वॉर्नचा महत्त्वाचा वाटा होता. शेन वॉर्नच्य निधनाने 30 वर्षाच्या क्रिकेट मैदानावरील तारा निखळला.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *