२७ मार्च रोजी ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांचा शाही थाटात विवाहसोहळा संपन्न झाला आहे. लग्नसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हरभजन सिंग सारख्या बहुतेक खेळाडूंनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. विनी रमण ही भारतीय वंशाची असल्याने मॅक्सवेल सोबतच्या रिलेशनवरून मॅक्सवेल हा भारताचा जावई होणार अशी चर्चा रंगली होती. विनीचे कुटुंब मूळचे चेन्नईचे मात्र तिचे संपूर्ण पालनपोषण ऑस्ट्रेलियातच झाले. विनी फार्मसिस्ट असून याच क्षेत्रात ती कार्यरत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या एका पुरस्कार सोहळ्यात मॅक्सवेल विनीला सोबत घेऊन गेला होता. त्यावरून मॅक्सवेल विनीच्या प्रेमात आहे असे बोलले जात होते.

गेल्या वर्षी या दोघांची एंगेजमेंट पार पडली होती आणि लवकरच आम्ही लग्न करणार असेही त्यांनी जाहीर केले होते. ग्लेन आणि विनी यांचे लग्न अगदी खाजगी पद्धतीने व्हावे अशी त्यांची ईच्छा होती . त्यासाठी जवळपास ३५० इतक्याच लग्नाच्या पत्रिका त्यांनी जवळच्या मित्रमंडळींना वाटल्या होत्या. त्यामुळे लग्नाला मोजकेच मित्रमंडळी आणि नातेवाईक असावेत अशी त्यांची ईच्छा होती. मात्र लग्नाबाबत अतिशय गुप्तता बाळगून असलेल्या मॅक्सवेल आणि विनीची लग्नपत्रिका गेल्या महिन्यात भारतीयांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. ज्यात तमिळ भाषेत मजकूर छापण्यात आला होता त्यामुळे ही भाषा ज्यांना अवगत होती ते सर्वजण लग्नाला येऊ शकतील अशी चिंता मॅक्सवेलला वाटू लागली होती. त्यासाठी त्यांच्या लग्नात अधिकची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी युरोप ट्रिप केली होती. हे दिघेही आपल्या इन्स्टाग्रामवरून एकत्र असलेले फोटो नेहमी शेअर करताना दिसतात. २०१९ साली मॅक्सवेल क्रिकेट पासून थोडासा बाजूला राहिला होता त्याच्या गर्लफ्रेंडमुळेच त्याचे मानसिक संतुलन ढासळले अशी त्यावेळी चर्चा होती.

मात्र या बातमीत कुठलेच तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते उलट विनीने मला त्या कठीण काळात खूप साथ दिली होती, मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी मला तिने खूप आधार दिला होता असं तो म्हणाला होता. मॅक्सवेल आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळला. पण त्याला विशेष काही करता आलं नाही. आयपीएल सामन्यात आरसीबी टीमला आलेल्या अपयशामुळे खेळाडूंना ट्रोल करण्यात आले होते यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. मॅक्सवेल आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळला पण त्यांना यश आले नाही असं त्यांनी नमूद केलं होत. तिच्याचमुळे मी ह्या कठीण काळातून स्वतःला सावरू शकलो होतो असे तो त्यावेळी म्हणाला होता. ग्ले मॅक्सवेल आणि विनी हे दोघे २०१७ सालापासून एकमेकाना डेट करत होते.