ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमण दोघेही लवकरच लग्नबांधनात अडकणार आहेत. येत्या २७ मार्च २०२२ रोजी त्यांचे तमिळ पद्धतीने लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ही लग्न पत्रिका तमिळ भाषेत आहे. त्यामुळे मॅक्सवेलने याबाबत चिंता व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. लग्नामुळे मॅक्सवेल काही दिवस आयपीएल सामन्यात खेळणार नसल्याचे अगोदरच सांगण्यात आले होते.

विनी ही भारतीय वंशाची असल्याने त्या दोघांच्या रिलेशनवरून मॅक्सवेल भारताचा जावई होणार अशी चर्चा रंगली होती. विनीचे कुटुंब मूळचे चेन्नईचे मात्र तिचे संपूर्ण पालनपोषण ऑस्ट्रेलियातच झाले. विनी फार्मसिस्ट असून याच क्षेत्रात ती कार्यरत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या एका पुरस्कार सोहळ्यात मॅक्सवेल विनीला सोबत घेऊन गेला होता. त्यावरून मॅक्सवेल विनीच्या प्रेमात आहे असे बोलले जात होते. गेल्या वर्षी या दोघांची एंगेजमेंट पार पडली होती आणि लवकरच आम्ही लग्न करणार असेही त्यांनी जाहीर केले होते. ग्लेन आणि विनी यांचे लग्न अगदी खाजगी पद्धतीने व्हावे अशी त्यांची ईच्छा होती . त्यासाठी जवळपास ३५० इतक्याच लग्नाच्या पत्रिका त्यांनी जवळच्या मित्रमंडळींना वाटल्या होत्या. त्यामुळे लग्नाला मोजकेच मित्रमंडळी आणि नातेवाईक असावेत अशी त्यांची ईच्छा होती. मात्र लग्नाबाबत अतिशय गुप्तता बाळगून असलेल्या मॅक्सवेल आणि विनीची लग्नपत्रिका भारतीयांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे ज्यात तमिळ भाषेत मजकूर छापण्यात आला आहे त्यामुळे ही भाषा ज्यांना अवगत आहे ते सर्वजण लग्नाला येऊ शकतील अशी चिंता मॅक्सवेलला वाटू लागली आहे.

लग्नाची पत्रिका आतापर्यंत अनेकांनी पाहिली असून लग्नाच्या ठिकाणी गर्दी होणार अशी काळजी त्याला वाटत आहे यामुळे आता अधिक सुरक्षा वाढवली जाणार असल्याचे सांगितले जाते. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सोशिअल मीडियावर पाहायला मिळत आहे पण ते दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकजण विचारताना पाहायला मिळत होते. पण आता त्यांची लग्न पत्रिका सोशिअल मीडियावर व्हायरल झालेलने अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्या चाहत्यांना मिळाली आहेत. असो ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमण या दोघांना देखील आयुष्याच्या ह्या सुंदर क्षणासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…