गेल्या काही दिवसात अनेक मराठी सेलिब्रिटींची घर घेण्याची स्वप्न पूर्ण झाली आहेत. अशातच अबोली मालिकेतील अभिनेत्री मौसमी तोंडवळकर हिचही घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मौसमी तोंडवळकर आणि अभिनेता सिद्धेश शेलार हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. या दोघांनी स्वतःचा युट्युब चॅनल देखील सुरू केलेला आहे. त्यामुळे अर्थार्जनाचा आणखी एक मार्ग त्यांना गवसला आहे. अशातच मुंबईत घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. मौसमी आणि सिद्धेश यांच्या या नव्या घराला अशोक मामांनी देखील भेट दिली होती.
खरं तर ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची आहे पण ही छान आठवण त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. अशोक सराफ त्यांचे आमंत्रण स्वीकारतील की नाही अशी सुरुवातीला त्यांना शंका होती. पण संवाद साधल्यानंतर अशोक मामांनी त्यांचं हे आमंत्रण स्वीकारलं आणि सोबत छान गप्पा देखील मारल्या. मौसमी तोंडवळकर या गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहेत.
त्यांना एक मुलगाही आहे. मालिकेत काम करत असताना त्यांची सिद्धेश शेलार सोबत ओळख झाली. मौसमी यांना एक मुलगा असूनही सिद्धेशने त्यांच्यासमोर हा दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. मौसमी यांनी पूर्ण विचार करून सिद्धेश सोबत लग्नगाठ बांधली. एकमेकांना सांभाळून घेत त्यांचा हा संसार आता सुखाने सुरू आहे. अशातच आता त्यांचं मुंबईत हक्काचं घरही बनलं आहे.