कलर्स मराठीवर रात्री ८.३० वाजता ‘अशोक मा मा’ ही मालिका प्रसारित होत आहे. हम पांच मालिकेनंतर अशोक सराफ पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशोक सराफ प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेबद्दल उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे निश्चितच या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशोक मामाचा मुलगा दुबईत असल्याने त्यांनी इथे एकटं राहावं लागत आहे. पण त्यांची सून पल्लवी नेहमी त्यांची आपुलकीने विचारपूस करत असते.
याच मालिकेत मायलेकीची जोडी एकत्र झळकताना दिसत आहे. शुभवी गुप्ते ही या मालिकेत अशोक मामांच्या नातीची भूमिका साकारत आहे. तर पल्लवीची भूमिका तिची आई म्हणजेच चैत्राली गुप्ते निभावताना दिसत आहे. या दोघी खऱ्या आयुष्यातल्या मायलेकी ऑनस्क्रीन सुद्धा तीच भूमिका निभावत आहेत. त्यामुळे दोघींसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली आहे. अर्थात शुभवी गुप्ते हिची ही पदार्पणातील पहिलीच मालिका आहे आणि यात तिला आईसोबतच काम करता येतंय म्हणून ती खूप खुश आहे. चैत्राली आणि भार्गवी चिरमुले या दोघी सख्या बहिणी आहेत.
दोघींनी मराठी सृष्टीत अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख बनवली आहे. तर चैत्रालीना नवरा अभिनेता लोकेश गुप्ते हेही एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. या मालिकेत लेकिसोबत पहिला सीन शूट करताना चैत्राली गुप्ते डायलॉगच विसरल्या होत्या. याबद्दल त्यांनी दिग्दर्शकाला माफी देखील मागितली. पण पहिल्यांदा लेकीचा अभिनय पाहून त्या थोड्याशा भावूक झाल्या होत्या. या दोघी माय लेकीचं हे बॉंडिंग त्यांच्या अभिनयातही सहज उतरलेलं पाहायला मिळतं.