news

अरबाज आणि पत्नी शुरा एअरपोर्टवर झाले स्पॉट…पण शुराला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

२४ डिसेंबर २०२३ रोजी अरबाज खान आणि शुरा खान यांचे लग्न थाटात पार पडले. खरं तर ५६ वर्षांचा अरबाज दुसऱ्यांदा बोहल्यावर चढतोय हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. कारण मालाईका आरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करू लागला होता. हे दोघेही लग्न करणार अशी चर्चा देखील पाहायला मिळाली होती. मात्र अरबाजचे जॉर्जिया सोबत ब्रेकअप झाले. पण त्यानंतर अरबाजच्या लग्नाची आचनकपणे बातमी समोर आली आणि तो मेकअप आर्टिस्ट शुरा खान सोबत लग्न करत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान रविना टंडनने अरबाज शुरासोबत लग्न करतोय अशी अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती. तेव्हा अरबाज कोणाशी लग्न करतोय याचा उलगडा झाला होता. हे लग्न अर्पिताच्या घरी अगदी खाजगीत पार पडल्याने या लग्नाला केवळ नातेवाईक आणि जवळच्याच मित्रांना त्यांनी आमंत्रण दिले होते.

arbaz khan wife shura khan
arbaz khan wife shura khan

त्यानंतर लग्नाचे काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. आता लग्नानंतर हे नवविवाहित दाम्पत्य त्यांच्या हनिमूनसाठी परदेश दौऱ्याला गेले आहे. नुकतेच अरबाज आणि शुरा खान एअरपोर्टवर स्पॉट झाले यावेळी मीडियाने त्यांना घेरले होते. अरबाज आणि शुराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अरबाजची पत्नी शुराला पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. गाडीतून खाली उतरल्यानंतर शुरा मिडियापासून स्वतःला लपवताना दिसली, यावेळी तिने डोक्यावर कॅप घातली होती. तर मागून आलेला अरबाज मीडियाला पाहून फोटोसाठी एक पोज देताना दिसला. पण त्यावेळी शुरा स्वतःला मिडियापासून दूर ठेवत एअरपोर्टवर आत जाण्यासाठी प्रोसेस पूर्ण करत होती.

arbaaz khan and shura wedding photos
arbaaz khan and shura wedding photos

पण त्याचवेळी अरबाजने शुराला फोटो काढण्यासाठी बोलावले तेव्हा त्यांची जोडी पाहून अनेकांनी शुराला ट्रोल केले. शुरा उंचीने कमी असल्याने ती त्याची मुलगीच आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली. तर काहींनी मालाईका हिच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली होती असेही म्हटले. तर काहींना ही जोडी विजोड वाटली. त्यामुळे अरबाज आणि शुरा दोघेही सोशल मीडियावर भयंकर ट्रोल होऊ लागले आहेत. दरम्यान नेटकऱ्यांचे म्हणणे काहीही असले तरी हे लग्न करून अरबाज मात्र त्याच्या चेहऱ्यावरून तरी खूपच खुश दिसत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button