
‘अप्पी आमची कलेक्टर’ हि श्वेता शिंदे यांची झी वाहिनीवरील मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं वेगळं कथानक असल्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार ह्याची उत्सुकता चाहत्यांना कायम लागून असते. मालिकेत भूमिका साकारणारे कलाकार हे इतर मालिकांतील कलाकारांच्या इतके प्रसिद्ध नसले तरी त्यांच्या उत्तम अभिनयाने मालिका पाहायला वेगळा रंग चढतो. हेच ह्या मालिकेचं खर यश आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील अर्जुन साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल आज आपण माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत…

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुनच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता रोहित परशुराम पाहायला मिळतो. रोहित परशुराम याने अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मिथुन या चित्रपटातून तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. राम सिया के लवकुश, देवी आदि पराशक्ती या हिंदी मालिका तसेच फुलाला सुगंध मातीचा, ज्ञानेश्वर माऊली, क्रिमीनल्स , रघु ३०५, आरं बा अशा मालिका आणि चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित हा मूळचा भोर गावचा. शरीरसौष्ठव म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विक्रम गोखले यांच्याकडे त्याने अभिनयाचे धडे गिरवले होते. नाटकातून काम करत असताना त्याला एका मित्राने विरोधी भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी सुचवले. पण वजन जास्त असल्यामुळे तो ह्या भूमिकेसाठी सूट होत नव्हता. अभिनयाची जिद्द मनाशी कायम धरत त्याने आपलं १६ किलो वजन काही दिवसातच कमी करून दाखवल. त्यानंतर मिथुन चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. वेगवेगळ्या मालिकेतून रोहित छोट्या मोठया भूमिका साकारू लागला. अभिनेता रोहित परशुराम ह्याची पत्नी देखील प्रसिद्ध मॉडेल आहे.

अभिनेता रोहित परशुराम ह्याच्या पत्नीचं नाव पूजा लक्ष्मण आव्हाड असं आहे. एक मॉडेल म्हणून ती सर्व परिचित आहे. पूजा हि मूळची नाशिकची असून तिने पुण्यात शिक्षण घेतलं आहे. सुरवातीपासूनच तिला मॉडेलिंगची भारी आवड होती ह्यातच करिअर करायचं तिने ठरवलं. अनेक स्पर्धेत तिने भाग घेऊन काही पारितोषिके देखील जिंकली आहेत. २०१८ च्या mrs. india worldwild च्या फायनल फेरीपर्यंत देखील मजल मारली होती. अनेक मॉडेलिंगच्या स्पर्धेत तिला आवर्जून बोलावलं जात. अभिनेता रोहित परशुराम आणि पत्नी पूजा आव्हाड ह्या दोघांना व्यायामाची भारी आवड. अनेकदा वर्कआउट करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ते नेहमीच शेअर जाताना पाहायला मिळतात. अभिनेता रोहित परशुराम आणि पत्नी पूजा लक्ष्मण आव्हाड ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…