गेले काही दिवस मराठी सृष्टीत कलाकारांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळाली. त्यात आता मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनची फायनलिस्ट म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर हिच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. बिग बॉसच्या घरात जाण्या आधीच अंकिता कुणाल भगत सोबत लग्न करणार होती. पण बिग बॉसमध्ये झळकण्याची संधी मिळत असल्याने तिने काही दिवस लग्न पुढे ढकलले. ती कोणासोबत लग्न करणार हे तिने जाहीर करणे टाळले होते. मात्र चाहत्यांची इच्छा म्हणून तिने कुणालला समोर आणले. कुणाल भगत हा संगीतकार गायक आहे. झी मराठी अनेक मालिकांच्या शीर्षक गीतासाठी तो ओळखला जातो. चित्रपट गितही त्याने गायली आहेत.
त्यामुळे कुणालची स्वतःची एक वेगळी ओळख या इंडस्ट्रीत पाहायला मिळते. अंकिता सोबत कुणालने एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. त्यावेळी तो तिच्या प्रेमात पडला होता. गेल्या डिसेंबरमध्ये त्याने अंकिताला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा अंकिताने त्याला होकार दिला होता. आता जवळपास १ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर हे दोघेही लग्नबांधनात अडकणार आहेत. नुकतेच या दोघांचे पहिले केळवण थाटात साजरे करण्यात आले. तर लग्नाची लगबग गेल्या २ महिन्यापासूनच सुरू झालेली पाहायला मिळाली होती. अंकिताने तिच्या लग्नाची पहिली पत्रिका तिच्या आजोळी असलेल्या कुलदैवतेजवळ ठेवली. केळीच्या पानाच्या रुपात असलेली तिची ही लग्नाची पत्रिका सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती.
हे देखील वाचा –
बापरे इतकी महागडी कार.. बिगबॉस फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने खरेदी केली आलिशान गाडी
“मी ह्यातून काढता पाय घेते, माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात”…सुरजच्या भेटीनंतर अंकिता सुरजमध्ये बिनसलं
घरच्यांचा खूप राग यायचा… ११ वर्षाने मोठा असलेला मुलासोबत पळून जाऊन बॉयफ्रेंडच्या घरी राहू लागली पण
तर दोन दिवसांपूर्वी अंकिताने ७२ लाख कितीही महागडी गाडी खरेदी करून सगळ्यांना आणखी एक सुखद धक्का दिला. तिचे हे यश पाहून अनेकांनी तिच्या कामाचं मोठं कौतुक केलेलं पाहायला मिळालं. अल्पावधीतच यश मिळणारी ही कोकण हार्टेड गर्ल आज याचमुळे टीकेला देखील सामोरी जात आहे. पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करून ती तिचं काम तेवढ्याच जोमाने करत आहे.