गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक आगळीवेगळी मिनी जीप पाहायला मिळत आहे. या जीपचे वैशिष्ट्य म्हणजे ही मिनी जीप टू व्हीलरप्रमाणे किक मारून स्टार्ट केली जाते. टू व्हीलरचे इंजिन, चार चाकी वाहनाचे बोनेट आणि रिक्षाची चार चाकं बसवून ही मिनी जीप तयार करण्यात आली आहे. सांगलीतील दत्तात्रय लोहार यांनी ही मिनी जीप तयार केल्याने सगळ्या नेटकर्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. दत्तात्रय लोहार यांचं शिक्षणही कमी असून त्यांनी केलेला हा जुगाड कौतुकास पात्र ठरत आहे.

हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा आम्हालाही अशी गाडी बनवून द्या म्हणून अनेकांनी त्यांना मागणी केली होती. या छोट्याशा जीपमध्ये साधारण चार व्यक्ती आरामात प्रवास करू शकतात शिवाय १ लिटर पेट्रोलमध्ये हे वाहन ४५ ते ५० किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो. हा व्हिडीओ स्वतः आनंद महिंद्रा यांनी शेअर करून दत्तात्रय लोहार यांचं कौतुक केलं आहे. कौतुका बरोबरच आनंद महिंद्रानी ही मिनी जीप विकत घेण्याचा निर्णय देखील घेतला आहे. या बदल्यात ते दत्तात्रय लोहार यांना बोलेरो देण्याची तयारी दर्शवली आहे. अर्थात दत्तात्रय लिहर यांनी बनवलेली मिनी जीप कौतुकास पात्र आहे परंतु हे वाहन स्थानिक प्रशासनाच्या नियमात बसत नसल्याने ती कधी ना कधी बंद पडेल. त्यामुळे मी ही गाडी विकत घेऊ इच्छितो ही गाडी मी महिंद्रा रिसर्च व्हॅली मध्ये ठेवेन त्यामुळे ही गाडी पाहून प्रेरणा मिळेल असे मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीतील दत्तात्रय लोहार यांनी ही मिनी जीप बनवून सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे. काहीतरी करून दाखवण्याची हि जिद्द आनंद महिंद्रा याना खूपच आवडली आहे.

आनंद महिंद्रानी आजवर अनेक गरजूना आणि त्यांच्या कल्पकतेच्या बुद्धिमत्तेला नेहमीच नावाजले आहे. दत्तात्रय लोहार यांचे देखील नशीब उजाडणार आहे. आज गुरुवारी २३ डिसेंबर रोजी आनंद महिंद्रा यांच्या कंपनीची एक टीम दत्तात्रय लोहार यांच्या सांगली येथील घरी जाऊन भेट घेणार आहेत आणि त्या गाडीची पाहणी करणार आहेत. आनंद महिंद्रा यांनी देऊ केलेल्या ऑफरसाठी दत्तात्रय लोहार यांनी त्यांचे आभार देखील मानले आहेत. केवळ स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली गाडी कधीही बंद पडली जाऊ शकते. ही गाडी नियमबाह्य बनवली असल्याने त्यावर कारवाई केली जाऊ शकते मात्र दत्तात्रय लोहार यांची त्यामागची मेहनत वाया जाऊ नये व आम्हाला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून मी त्यांच्याकडून ही गाडी विकत घेणार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी स्पष्ट केले आहे.