काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने मुंबईत ३ बीएचके फ्लॅट खरेदी केल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता या नव्या घरात तिने गृहप्रवेश केलेला पाहायला मिळतो आहे. अमृता खानविलकरने नव्या वर्षाची ही सुरुवात गृहप्रवेशाने केली आहे. तिच्या या नवीन घराला तिने व्हाइट रंगांची थीम निवडली असल्याने हे घर अधिकच ऐसपैस जाणवतं. आकर्षक प्रवेश द्वार आणि तेही सफेद रंगातच असल्याने मन प्रसन्न राहतं. या घराची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. मधल्या काळात आईचं आजारपण आणि कामाचा व्याप यामुळे अमृता थोडीशी बिजी होती.
पण आता नवीन वर्षाची तिची सुरुवात आनंदाने झालेली पाहायला मिळत आहे. अमृता खानविलकर हिने मराठीसह हिंदी सृष्टीतही स्वतःची ओळख बनवली आहे. पण हिंदीत काम करत असताना अनेकदा मराठी टोन मुळे तिला हिनवलं जायचं. अर्थात त्याला ती तिच्या भाषेत योग्य ते उत्तर देऊन समजवायची. चंद्रमुखी या चित्रपटातली तिची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटामुळे तिचा मानसी नाईक सोबतही वाद झाला होता. अर्थात कालांतराने या गोष्टींचा विसर पडत गेला. तर नवरा हिमांशू सोबत ती राहत नसल्याने त्यांचा घटस्फोट झाला अशाही वावड्या उठवण्यात आल्या.
पण अमृता ही सगळी आव्हानं पेलत आज इथपर्यंत पोहोचली आहे. स्वामींवर तिची श्रद्धा आहे आणि ते आपल्याला या सगळ्या संकटातून मार्ग दाखवतात असा तिचा विश्वास आहे. अनेक चिमटे खाल्लेत म्हणणाऱ्या अमृतासाठी तिचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. पण तरीही नवरा, आई वडील आणि बहिणीची साथ तिच्या कायम पाठीशी आहे. म्हणूनच मी हे करू शकले असे ती म्हणते.