गेले दोन महिने माझ्यासाठी खूप अवघड होते….जीवनाला हादरवून टाकणाऱ्या अशा अचानक काही घटना घडतात त्या मीही अनुभवल्या
अमृता खानविलकर सध्या झी मराठीच्या ड्रामा जुनीअर्स या रिऍलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका बजावत आहे. पण ही भूमिका निभावत असताना खऱ्या आयुष्यात ती एका कठीण प्रसंगाला सामोरी जात आहे. कारण गेली दोन महिने अमृता खानविलकर हिच्या आईची प्रकृती चिंताजनक होती. अर्थात स्वामींवर अपार श्रद्धा असल्याने ते आपल्याला या संकटातून निश्चितच बाहेर काढतील असा तिला विश्वास आहे. अमृता तिच्या आईच्या खुपच क्लोज आहे. अगदी रात्री अपरात्री कधीही शुटिंगवरून घरी आल्यानंतर तिला काही खायचं असेल तर ती आईजवळ हट्टाने काही मागू शकते. अर्थात कुठलीही आई तिच्या मुलांसाठी नेहमीच हजर असते. त्यात अमृता खानविलकर तिच्या आईची नेहमीच उदाहरणं देताना दिसते. पण नुकतेच अमृताच्या आईवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.
आईची प्रकृती नाजूक असल्याने अमृता गेले काही दिवस खुपच अस्वस्थ होती. आज तिच्या आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या कठीण प्रसंगाबद्दल भावुक झालेली अमृता म्हणते की, ” गुरु म्हणजे पाठीशी उभा राहणारा, गुरु म्हणजे वाट दाखवणारा, आपल्या वर येणारं संकट झेलण्याची ताकत देणारा, आणि हे सगळं….. न मागता देणारा म्हणजे गुरु. गेले दोन महिने माझ्या साठी माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते … माझी आई हिची ५ तारखेला open heart surgery करण्यात आली …. तिला कुठल्या हि प्रकार चा अटॅक किंव्हा कसला हि जीव घेणा त्रास झाला नाही …. मम्मा ची कंडिशन आम्हाला डिटेक्ट करता आली आणि त्यावर योग्य तो उपचार करता आला ह्यात फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती. मला मनापासून धन्यवाद म्हणायचे आहेत ते म्हणजे ASIAN HEART INSTITUTE BKC ह्यांचे…डॉ रमाकांत पांडा ज्यानी surgery keli ( sir you were god sent ) …. डिसिल्वा सर …. वंजारे सर …. ICU च्या सिस्टर्स … GENERAL वॉर्ड च्या सिस्टर्स …. डॉ रोशन …. DOC Iram आणि तिथल्या संपूर्ण स्टाफ चे मनापासुन धन्यवाद!” म्हणत अमृताने या सगळ्यांचे आभार मानले आहेत.
अमृता पुढे असेही म्हणते की, “जीवनाला हादरवून टाकणाऱ्या अशा अचानक काही घटना घडतात त्या मीही अनुभवल्या. मी माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबाचे आभार मानू इच्छिते जे माझ्या पाठीशी सावलीसारखे उभे होते. तुम्हा सर्वांना माहित आहे की तुम्ही माझ्यासाठी देव आहात. आई आता बरी होत आहे आणि प्रत्येक स्त्री खऱ्या अर्थाने आयर्न लेडी आहे हे ती दाखवून देत आहे. श्रीस्वामी समर्थ माझ तुझ्यावर प्रेम आहे पुनश्च – ही संधी साधून घडलेली ही घटना सर्वांना सांगायची आहे की , कृपया तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही आरोग्याला गृहीत धरू नका. 3 वर्षांपूर्वी मी माझा एक मौल्यवान हिरा गमावला. माझी आई आतापर्यंत कुठल्याही आरोग्य कारणास्तव दवाखान्यात गेली नाही (टच वुड) पण तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली…. त्यामुळे कृपया नियमित तपासणी करून घ्या, कृपया आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका… देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो. गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा”. असे म्हणत अमृताने आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्यास सांगितले आहे.