नवीन वर्षाची सुरुवात म्हणत नुकतेच अमृता खानविलकरने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केलेला पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून मराठी सेलिब्रिटींसाठी मुंबईत हक्काचं घर घेणं आता सोपं झालं आहे. प्रसाद ओक, अवधूत गुप्ते, सई ताम्हणकर आणि आता अमृता खानविलकरनेही आलिशान घर खरेदी करण्याचा विचार केला. यात अमृताने चक्क ३ बीएचके फ्लॅट खरेदी करून सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकले. नुकतेच गृहप्रवेशाचा एक व्हिडिओ तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
पण हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अमृताला ट्रोल देखील केलं आहे. अमृता खानविलकर या व्हिडीओत तिच्या आईवडील आणि बहीणीसह गृहप्रवेश करताना दिसली मात्र यात तीचा नवरा हिमांशू मल्होत्रा मात्र कुठेच दिसला नाही. तेव्हा नेटकऱ्यांनी अमृताला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘या सगळ्यात तुझा नवरा कुठेच दिसत नाही?’ असा प्रश्नच तिला विचारण्यात आल्याने अमृताने या नेटकऱ्याला चोख उत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. ‘जाऊन माझ्या युट्युब चॅनलवरचा व्हिडीओ बघा’ असे म्हणत अमृताने या ट्रोलरला उत्तर दिलं आहे. ( इथे पहा – गृह्प्रवेशाचा व्हिडिओ ज्यात तिचा नवरा हिमांशू देखील पाहायला मिळतो) खरं तर इन्स्टाग्रामवर अमृताने शेअर केलेल्या व्हिडिओला लिमिट्स असल्याने पूर्ण व्हिडीओ दाखवता येणे शक्य नव्हते.
अर्थात स्वतःचा युट्युब चॅनल असल्याने तिने हा पूर्ण व्हिडीओ तिच्या चॅनलवर अपलोड केला आहे. नवीन घराचं रूप, हिमांशू सोबतचा नवीन घरात प्रवेश असं बरंच काही त्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यात आणखी एका नेटकऱ्याने अमृताला ‘ हा तुझा आनंद तू एकटीच कसा साजरा करते’ असं म्हटलं आहे. तेव्हा अमृताने उत्तर देताना म्हटले की, ‘माझ्या मागे बघा माझे वडील आहेत, आई आहे बहीणही आहे. हे तुम्हाला का दिसत नाही याबद्दल मला खरंच काही कळत नाही. हेच माझे खरे आधारस्तंभ आहेत. फक्त त्यात काहितरी कारण शोधत बसू नका.’