माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी मागच्या काही वर्षात खूप चांगलं काम केलं असं बोललं जात पण ह्यावेळी त्यांच्या सरकारला जास्त मते मिळून देखील महाराष्ट्रात त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेने स्वतःच वेगळं सरकार उभं केलं त्यावर देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या नेहमीच सरकारच्या त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत करतात. काल अमृता फडणवीस ह्यांनी एक फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला चला त्या काय म्हणाल्या पाहुयात …

अमृता फडणवीस ह्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काल मुंबईत रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा फोटो शेअर करत एका हाताने अंगठा खाली करत शिवसेनेच निकृष्ठ दर्जाचं काम असल्याचं उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईत पावसाळ्यात रस्तेच दिसत नाहीत असा त्यांनी टोला लगावलाय. फोटो शेअर करत त्या म्हणतात “इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !” त्यांच्या ह्या पोस्ट मुळे त्याच पुन्हा चर्चेत आल्या आहेत. नेटकाऱ्यानी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत तुमचं देखील सरकार होत मग तुम्ही त्यावेळी असं का दाखवलं नाही असा सवाल केला आहे. अनेकांनी महाराष्ट्रात राहता तर किमान मराठी तरी लिहा असं म्हटलंय. अनेकांनी पेट्रोलच्या वाढत्या भावावर प्रश्न उपस्तीत करत किमान पेट्रोलचे भाव कसे कमी करता येतील ह्यासाठी काहीतरी मदत करा असं सुचवलं आहे. आम्हाला मुंबईच्या पावसाची सवय झालीय पण वाढत्या महागाईला आम्ही कंटाळलोय आणि आता आमच्या मुलाबाळांच्या हातच काम देखील गेलय त्यासाठी काहीतरी मदत करा किंवा त्यासाठी काय करता येईल ते सुचवा असा उलट प्रश्न केला आहे.