Breaking News
Home / जरा हटके / अमरावतीच्या तरुणीचं ‘नऊवारी रॅप सॉंग’ घालतंय देशभर धुमाकूळ विदर्भातली पहिली तरुणी जिने

अमरावतीच्या तरुणीचं ‘नऊवारी रॅप सॉंग’ घालतंय देशभर धुमाकूळ विदर्भातली पहिली तरुणी जिने

नऊवारी साडीतली एक तरुणी सध्या आपल्या रॅप सॉंगमुळे देशभरातल्या सगळ्या तरुणाईला वेड लावत आहे. या गाण्यामुळे ही तरुणी १० स्पर्धकांवर भारी पडली असल्याचे परिक्षकांचे म्हणणे आहे. एम टीव्ही वाहिनीवर हसल २.० हा रिऍलिटी शो प्रसारित केला जात आहे. प्रसिद्ध रॅप सिंगर बादशाह या शोमध्ये जजची भूमिका निभावत आहे. तर अर्पण कुमार चांडेल, संथनम श्रीनिवासन, दीपा उंनिकृष्णन, डिनो जेम्स चारजण स्क्वॅड बॉसच्या भूमिकेत दिसत आहेत. हसल २.० चा हा दुसरा सिजन आहे या सिजनमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील हजारो स्पर्धकांनी ऑडिशन दिली होती. अंतिम फेरीतून १६ स्पर्धकांची निवड करण्यात आली असून हे रॅपर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

aarya jadhav rap
aarya jadhav rap

महत्वाचं म्हणजे अमरावतीची एक तरुणी या स्पर्धेत सहभागी झाली असून तिने नऊवारी साडी नेसून गायलेलं नऊवारी हे रॅप सॉंग सगळीकडे तुफान व्हायरल झालं आहे. या तरुणींचं नाव आहे ‘आर्या जाधव’. आर्या जाधव ही अमरावतीची आहे. अमरावतीच्या होली क्रॉस इंग्लिश मिडीयम स्कुल मधून तिने शिक्षण घेतले होते तर पुढे नागपूरला जाऊन श्रीमती मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर कॉलेज मधून तिने आर्किटेक्टची पदवी मिळवली. मात्र रॅप सॉंग गाण्याची तिला खूप आवड होती. आर्याला तिच्या आईकडूनच याबाबत प्रेरणा मिळाली असे म्हणायला हरकत नाही कारण आर्याच्या आईला देखील कविता करण्याची आवड आहे असे ती म्हणते. २०१९ साला पासून आर्या रॅप सॉंग गाते. विदर्भातील पहिली महिला रॅपर म्हणून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. युट्युबवर QK या नावाने ती रॅप सॉंग गात आहे. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी नऊवारी साडी हे रॅप सॉंग तिचं प्रसिद्ध करण्यात आलं आणि या गाण्याला अवघ्या काही दिवसातच चार लाखांहून अधिक व्हीव्हज मिळाले. तिच्या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर नाचवलं.

aarya jadhao singer
aarya jadhao singer

केवळ महाराष्ट्रातच नाही तर अगदी दिल्ली, बिहार, आंध्रप्रदेश, जोधपूर, मध्यप्रदेश, केरळ, उत्तर भारतातून गाणं आवडलं असल्याच्या भरभरून प्रतिक्रिया मिळू लागल्या. ‘बरबादी का गाना’, ‘जिंदा निर्भया तू बन’ या तिने गायलेल्या गाण्याची देखील वाहवा झाली. प्रत्येक कलाकाराला एक प्लॅटफॉर्म हवा असतो जिथे त्यांच्या कलेची दखल घेण्यात येईल. आर्याला देखील हसल २.० या शोचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि या प्लॅटफॉर्मवर तिने आपल्या रॅप सॉंगने धुमाकूळ घातलेला दिसला. विदर्भातली आर्या नऊवारी साडी नेसून संपूर्ण देशात नावारूपाला आल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आर्या जाधव हिला या रिऍलिटी शोमध्ये नक्कीच यश मिळणार आहि तिच्या चाहत्यांची ईच्छा आहे. या पुढील प्रवासासाठी आर्या जाधवला खूप खूप शुभेच्छा!.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *