बॉलिवूड मध्ये कादर खान यांची सर्वात जास्त सुपरहिट जोडी ठरली ती गोविंदासोबत. कुली नं 1, दुल्हे राजा अशा अनेक चित्रपटातून त्यांनी गोविंदाला जावयाच्या रुपात स्वीकारले या दोघांची जोडी म्हणजे चित्रपटात नक्कीच धमाल येणार हे ठरलेले गणित परंतु बॉलिवूड मधील एका ग्रुपने कादर खानला नाकारले होते त्याला कारणही तसेच होते. एका मुलाखतीत कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्या ग्रुपने आपल्याला का बाजूला फेकले याचा एक किस्सा सांगितला होता. कादर खान आणि अमिताभ बच्चन सुरुवातीपासूनच एकमेकांना खूप चांगले ओळखत होते.

दोघांनी एकत्रित अनेक चित्रपट साकारले त्यामुळे कादर खान अमिताभ बच्चन यांना अमित म्हणूनच हाक मारायचे. मात्र एक दिवस एका दाक्षिणात्य व्यक्तीने अमिताभ बच्चन समोरून येताच “सरजी येतायेत” असे कादर खान यांना म्हटले . त्यावेळी हा सरजी नेमका कोण? अरे तो तर अमित आहे…यावर तो व्यक्ती कादर खान यांना म्हणाला की आम्ही अमिताभ बच्चन यांना नेहमीच सरजी या नावाने हाक मारतो. त्यानंतर कादर खान म्हणतात की मला त्यावेळी अमिताभला सरजी म्हणावं असं मुळीच वाटलं नाही…माझ्या तोंडून तो शब्दच निघाला नाही. केवळ सरजी तोंडातून न निघाल्याने मी त्या ग्रुपमधूनच बाजूला फेकला गेलो कादर खान यांचे यावर मत होते की… कोणी आपल्या भावाला, मित्राला दुसऱ्या कुठल्या नावाने हाक का मारेल…माझ्या तोंडून तो शब्द नाही निघाला म्हणून माझं त्या ग्रुपच्या बाहेर जाणं त्यांना योग्य वाटलं. याच कारणामुळे मी खुदा गवाह चित्रपटात नव्हतो…त्यानंतर गंगा जमुना सरस्वती मी अर्धी लिहिली होती त्यानंतर हा चित्रपट मी सोडून दिला…तर आणखी काही चित्रपट शेवटच्या क्षणी येऊन ठेपले ते देखील लिहिण्याचे मी सोडून दिले. कुली चित्रपटाचे शूटिंग करून मी घरी निघालो तेव्हा अमिताभ बच्चन यांनी आवाज देऊन बोलवले तुमचं शूटिंग झालंय तर तुम्ही घरी जा परवा परत आल्यावर तुमच्या चित्रपटाची अनौससमेंट आम्ही इथेच करू शिवाय चित्रपटाचा मुहूर्त देखील इथेच करू असे म्हणून तिथून जाण्यास सांगितले.

या चित्रपटा अगोदर कादर खान यांनी शमा चित्रपट बनवला होता या चित्रपटावेळी कादर खान यांना खूप त्रास सहन करावा लागला. एका ऍक्टरने कधीच प्रोड्युसर बनल नाही पाहिजे. हा माझ्या आयुष्यातला खूपच कठीण काळ होता असं ते म्हणतात. . कुली चित्रपटावेळी दोन दिवसांनी मी पुन्हा शूटिंगसाठी जायला निघालो त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ यांनी मला नको जाऊ म्हणून सांगितले अमिताभ बच्चन यांना खूप मोठी दुखापत झाली आहे. पुढील दोन दिवस मला त्यांनी अव्हॉइड केलं. मात्र अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली हे पाहून मी बंगलोरला दाखल झालो तिथून पुन्हा उपचारासाठी मुंबईत त्यांच्यासोबतच आलो. यात बरेच दिवस लोटले. त्यानंतर अमिताभ बच्चन राजकारणात शिरले एमपी बनल्यावर त्यांचे आयुष्यच पूर्णपणे बदलून गेले त्यानंतर माझ्यासोबतचे त्यांचे मैत्रीचे संबंध देखील संपुष्टात आले. तो माझा खूप चांगला मित्र होता , लंगोटीयार होता पण हे सर्व सर्व काही संपुष्टात येऊ लागले होते…..बॉलिवूडची ही काळी बाजू आज पडद्या मागे झाकली असली तरी ती कधी ना कधी उघड होतेच हे सत्य सर्वानाच स्वीकारावे लागेल…