वजन प्रचंड वाढून ११० किलो झालं ६ महिने अंथरूणावरून.. अभिनेत्री अलका कुबल यांनी प्रथमच सांगितलं अचानक जाड होण्यामागचं कारण

अलका कुबल यांनी मराठी सृष्टीला एक भरीव योगदान दिलं आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री तर त्या आहेतच मात्र निर्माती म्हणूनही त्यांनी प्रेक्षकांना अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. एवढंच नाही तर आता मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूर मध्ये २ मल्टिप्लेक्स बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. आता गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हे मल्टिप्लेक्स प्रेक्षकांसाठी खुले होतील. पण या सगळ्या प्रवासात अलका कुबल यांनी एक कठीण काळही अनुभवला होता. गेली ४० वर्षे इंडस्ट्रीत काम करत असलेल्या अलका कुबल यांना वाईट काळ अनुभवायला मिळाला.

या काळात सायनींग केलेले चित्रपट निर्मात्यांनी काढून नेले होते. २००७ साली अलका कुबल यांचा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये मणक्याचा भाग पूर्णपणे मोडल्याने मोठं ऑपरेशन त्यांच्यावर करण्यात आलं. यबद्दल नुकताच त्यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, “२००७ ला माझा अपघात झाला त्यावेळी मोठी सर्जरी झाली. माझे मणके काढले, रिप्लेस केले, त्यात प्लेट घातली. त्यावेळी माझं वजन प्रचंड वाढून ११० किलो झालं होतं. ६ महिने अंथरूणावरून उठू शकत नव्हते. तेव्हा माझ्या हातातून सायनिंग केलेले सिनेमे निर्मात्यांनी काढून नेले. रंगलेल्या चेहऱ्याचे मुके घ्यायला असतात, तुमचा सुकाळ असला की!… पण हेही दिवस मी अनुभवले. माझे डॉक्टर होते रामाणी , लिलावतीत माझी सर्जरी केली होती.

संध्याकाळी मला उठताही येत नव्हतं पण त्यांनी मला धरून उठवलं आणि संपूर्ण लीलावती फिरवून आणलं ‘उभी राहायचंस, तू एक चांगली कलाकार आहेस! हे धरून बसू नकोस मी तुला उभं करणार!’…त्यांच्यात मला देवच दिसला. मी देव पाहिला नाही पण एक माणूस देवाच्या रुपात आलाय आणि त्याने मला उभं केलं!” असं अलका कुबल यांच्या बाबतीत घडलं. दरम्यान या अपघातानंतर त्यांचं वजन खूपच वाढत गेलं होतं.