Breaking News
Home / जरा हटके / काल आईच निधन झालं आणि आज अक्षयचा वाढदिवस अक्षयने लिहली भावनिक पोस्ट

काल आईच निधन झालं आणि आज अक्षयचा वाढदिवस अक्षयने लिहली भावनिक पोस्ट

अक्षय कुमारचा ९ सप्टेंबर १९६७ अमृतसर मध्ये जन्म झाला आज तो ५४ वर्षांचा झालाय. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काल ८ सप्टेंबर २०२१ रोजी त्याच्या आईच निधन झालं. आपल्या वाढदिवसाच्या सोहळा आईसोबत नेहमी साजरा करणारा अक्षय आज आईला मिस करताना पाहायला मिळतोय. तो म्हणतो ” असे कधीच आवडले नसते पण मला खात्री आहे की आई मला तिथूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे! तुमच्या प्रत्येकाचे आभार तुमच्या सहानुभूती आणि शुभेच्छांसाठी मी तुमचा ऋणी राहील आयुष्यात नेहमी पुढे जाणे गरजेचे असते.” पुढे तो म्हणतो …

akshay kumar with mother
akshay kumar with mother

आईच्या निधनानंतर तो खूपच भावुक झालेला पाहायला मिळाला होता. आई माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि आज मी जो काही आहे तो तिच्या काष्ठाचंच फळ आहे असं तो नेहमी म्हणताना पाहायला मिळतो. अक्षय पुढे देखील असं म्हणतो कि ” ती माझी गाभा होती आणि आज मला माझ्या अस्तित्वाच्या मुळाशी असह्य वेदना जाणवते. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतपणे या जगाचा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसर्या जगात गेली. मी आणि माझे कुटुंब या वाईट काळातून जात असताना तुम्ही दिलेल्या प्रार्थनांचा आदर करतो. ओम शांती”. वडिलांच्या जाण्यानंतर अक्षय आई त्याच्या बहिणीचा सांभाळ तिच्या आईने केला. आज अक्षय प्रगतीच्या उंच शिखरावर असला तरी त्याने हे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे गेला आहे. मध्यमवर्गीय आणि अभिनयाची कोणतीही पार्श्ववभूमी नसताना बॉलीवूडमध्ये त्याने शून्यातून आपलं विश्व् निर्माण केलं आहे. आज तो एक प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती असला तरी अनेक गरजूना तो नेहमीच मदत करताना पाहायला मिळतो.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *