सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेतील अभिनेत्री लवकरच एका नव्या दमाच्या मालिकेतून आणि एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे अजूनही बरसात आहे या मालिकेत त्यांनी ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे उमा सरदेशमुख. उमा सरदेशमुख यांनी अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराजच्या आईची भूमिका निभावली होती. सुरुवातीला थोडेसे विरोधी भूमिका दर्शवणारे त्यांचे पात्र हळूहळू मिराच्या बाजूने आणि तिला आपली सून करण्याच्या बाजूने वळलेले पाहायला मिळत आहे.

त्यामुळे त्यांनी साकारलेले पात्र प्रेक्षकांना देखील विशेष भावले आहे. परंतु लवकरच उमा सरदेशमुख ह्या सन मराठी ह्या नव्याने सुरू झालेल्या वाहिनीवरील कन्यादान या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या कन्यादान मालिकेतील भूमिकेचे नाव आहे आशालता. “आजपर्यंत माझ्याप्रत्येक भूमिकेवर प्रेम केलंत, आता येतीये आणखी एका नवीन भूमिकेत…आशालता…एक वेगळी भूमिका एक वेगळा अनुभव. “कन्यादान” आजपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता नक्की बघा…” असे म्हणून त्यांनी आपल्या नव्या भूमिकेबाबत सांगितले आहे. त्यामुळे उमा सरदेशमुख आता अजूनही बरसात आहे या मालिकेतून तूर्तास तरी ब्रेक घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजवर अनेक कलाकारांनी एका सोबत आणखी काही मालिका साकारल्या आहेत पण ह्या महामारीच्या काळात वयस्कर अभिनेत्यांना हे एकापेक्षा जास्त भूमिका साकारणे जड जाताना पाहायला मिळते. झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा देखील तू म्हणशील तसं हे नाटक रंगभूमीवर पुन्हा एकदा आणत आहे. त्यामुळे तो देखील आता दोन्ही भूमिका निभावताना तारेवरची कसरत करताना दिसणार आहे. ब्रेक घेऊन तो देखील पुन्हा वाल्मीलेलं तसा आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे.