news

अजय अतुलने मोठी अफरातफर आर्थिक फसवणूक केली आमचं आयुष्य बरबाद केलं.. काळे झेंडे दाखवत महिलेने केला निषेध

अजय अतुल हे संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव मानलं जातं पण नुकत्याच एका इव्हेंटमध्ये त्यांना अफरातफर, आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील बालेवाडी येथे हा सगळा प्रकार घडला होता. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. राधिका कुलकर्णी या आयोजक आहेत. २०१७ मध्ये अजय अतुल यांची एक कॉन्सर्ट पार पडली होती त्या कॉन्सर्टचे आयोजन राधिका यांनी केले होते. पण तेव्हा अजय अतुल यांनी मोठी अफरातफर करून आपली आर्थिक फसवणूक केली असा आरोप राधिका कुलकर्णी यांनी अजय अतुल यांच्यावर केला आहे. ‘ती कॉन्सर्ट राधिका यांची असूनही अजय अतुल यांनी ती स्वतःची असल्याचे सांगत त्याचे राईट्स चॅनलला विकले होते. त्यातून मिळालेले तब्बल ४ कोटी रुपये अजय अतुल यांनी लाटले आणि आम्हाला भिकेला लावलं’ असा आरोप राधिका यांनी केला आहे.

ajay atul with radhika kulkarni
ajay atul with radhika kulkarni

आज ७ वर्षानंतरही राधिका कुलकर्णी न्याय मिळावा म्हणून झगडत आहेत. फिरोदिया करंडक वेळी अजय अतुल हजेरी लावणार तेव्हा राधिका कुलकर्णी तिथे काळे झेंडे घेऊन अजय अतुल यांचा निषेध करत मोर्चा घेऊन येणार होत्या म्हणून पोलिसांनी १४९ची नोटीस देऊन अटक करण्याची त्यांना धमकी दिली आहे. बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेर यासंदर्भात तीव्र आंदोलन केले आहे. सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पैसे अजय अतुल यांनी खाल्ले आहेत आणि हा न्याय मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे अशा तीव्र शब्दांत राधिका यांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान राधिका कुलकर्णी यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना म्हटले आहे की, अजय – अतुल जोडीने आमचे आयुष्य उध्वस्त केलेय. पुणे – सन 2017 साली झालेल्या अजय अतुल यांची बालेवाडी स्टेडियम येथील कॉन्सर्ट गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने आयोजित केली होती. या कॉन्सर्टसाठी अजय अतुल यांना मानधन द्यायचे ठरले होते कारण त्यांनी कबूल केल्याप्रमाणे तसे कलाकार त्यांनी या कार्यक्रमात सहभागी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या कॉन्सर्टसाठी मानधन सुद्धा दिले. तिकीट विक्रीच्या माध्यमातून गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला काही लाख रुपये जमा करणे शक्य झाले. गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला काही कोटी रुपयांचा यामध्ये प्रचंड मोठा फटका बसला. अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार यामुळे हवालदिल झाले आहेत.

radhika kulkarni news
radhika kulkarni news

अनेकांची लाखो कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत संगीतकार गायक अजय अतुल जोडीने ही रक्कम स्वार्थासाठी हडप केलीय. गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने त्यांचे कोट्यावधी रुपये वसूल व्हावेत व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत याकरिता कलर्स मराठी चॅनलला संबंधित लाईव्ह कॉन्सर्ट प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला मात्र अजय अतुल यांनी संबंधित कॉन्सर्टचे आयोजक आपण स्वतः असल्याचे भासवून परस्पर कलर्स मराठी कडून पैसे गैर मार्गाने स्वतःच्या नावावर घेतले आहेत. तर दुसरीकडे कॉन्सर्टसाठी आलेल्या विदेशी ऑर्केस्ट्रा बँड पथकाला देखील गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंटने वेगळी रक्कम दिलीय. यामुळे गोल्डन एंटरटेनमेंट कंपनीला लाखो रुपयांचा फटका बसला आहे शिवाय स्वतःला एक रुपया देखील मिळालेला नाही. यामुळे गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीचे संचालक संपूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत. एकीकडे गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीकडून कॉन्सर्टसाठी पैसे वसूल करायचे तर दुसरीकडे कलर्स मराठी चॅनलला आपणच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठी कडून कईक कोटी रुपये उकळायचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत व मनी लॉन्ड्री देखील झालेली आहे, त्यामुळे अजय अतुल यांच्या गैरमार्गाने कमविलेल्या रुपयांच्या संपत्तीची व रकमेची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी

आणि एवढेच नाही तर येत्या २० तारखेला परत पुण्यामध्ये येऊन कॉन्सर्ट करायची तयारी हे जोडी दाखवत आहे. फिरोदिया करंडक स्पर्धेच्या प्राईस डिस्ट्रीब्यूशन साठी परत जाण्याची तयारी हे कलाकार दाखवत आहेत हा एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून????? यामध्ये फक्त हे कलाकार दोषी नाहीत तर यांना सपोर्ट करणार कलर मराठी चॅनल सुद्धा तेवढेच दोषी आहे. सोबत सामान्य लोकांनी तिकीट काढून येऊन कार्यक्रम बघितलेल्याचे व्हिडिओ आणि कलर्स मराठी चैनलने एडिट करून प्रसारित केल्याचे व्हिडिओ हे दोन्ही टाकत आहेत एखाद्याचं नाव आणि लोगो कलर्स मराठी चैनल कसं काढून टाकू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे खाली टाकलेले व्हिडिओ आहेत कलर्स मराठी ने २०१७ची कॉन्सर्ट ही २०२२ मध्ये झालेली असे दाखवून सर्व रसिकांची फसवणूक केलेली आहे. मित्रहो, आज मी ह्या आहे त्या जागी उद्या तुमची सुद्धा लेकरं बाळं असू शकतात…!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button