Breaking News
Home / जरा हटके / “अग्गबाई सुनबाई” मालिकेतील अभिनेत्री बद्दल माहित नसलेल्या गोष्टी पती करतो हे काम

“अग्गबाई सुनबाई” मालिकेतील अभिनेत्री बद्दल माहित नसलेल्या गोष्टी पती करतो हे काम

झी मराठी वाहिनीवरील बहुतेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्यातील एक म्हणजे “अग्गबाई सुनबाई” ही मालिका देखील आता लवकरच एक्झिट घेण्याच्या तयारीत आहे. झी वाहिनीने अग्गबाई सासूबाई या मालिकेचा सिकवल काढून ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली. मात्र काही महिन्यातच या मालिकेला प्रेक्षकांनी नाकारलेले पाहायला मिळाले. मालिकेत एक नवखा चेहरा शुभ्राच्या भूमिकेत पाहायला मिळाला. या शुभ्राची भूमिका साकारली ती अभिनेत्री “उमा ऋषिकेश” हिने. उमा ऋषीकेशने आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज ३० जुलै रोजी अभिनेत्री उमा ऋषिकेश हिचा वाढदिवस आहे. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात…

uma hrishikesh wedding photo
uma hrishikesh wedding photo

अग्गबाई सुनबाई या मालिकेअगोदर ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतून उमाने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. एसएनडीटी महाविद्यालयातून उमाने एमएची पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय कथ्थक आणि नाट्य संगीताचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. उमा ऋषिकेश हिचे पूर्ण नाव आहे “उमा ऋषिकेश पेंढारकर” प्रसिद्ध गायक, नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर हे तिचे सासरे तर प्रसिद्ध नाट्य कलाकार, गायक भालचंद्र पेंढारकर यांची ती नातसून होय. उमाचा नवरा ऋषिकेश पेंढारकर हे आर्किटेक्ट आहेत. अभिनयापासून तो दूरच आहे पण सेटवर अनेकदा हजेरी लावताना पाहायला मिळतो. उमा आणि ऋषिकेश यांचे फोटो सोशल मीडियावर तुम्हाला क्वचितच पाहायला मिळतील मात्र हे दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत हे त्यांचे फोटो पाहून समजेल. प्रशांत दामले यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकात उमाने रेवतीची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच संगीताचीही आवड असलेल्या उमासाठी हे नाटक खूपच खास ठरले होते. या भूमिकेसाठी तिला राज्यपुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. अभिनेत्री उमा ऋषिकेश हीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

actress uma pendharkar
actress uma pendharkar

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.