Breaking News
Home / ठळक बातम्या / अग्गबाई सुनबाई मालिकेच शूटिंग संपल … सोहमने शेअर केली भावनिक पोस्ट

अग्गबाई सुनबाई मालिकेच शूटिंग संपल … सोहमने शेअर केली भावनिक पोस्ट

अग्गबाई सासूबाई मालिकेच्या भरभरून यशानंतर झी वाहिनीने अग्गबाई सुनबाई मालिका सुरु केली पण जवळपास सर्वच मालिकांचा टीआरपी इतका घसरला कि एकाचवेळी तब्बल ५ मालिका संपवून नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत. अग्गबाई सुनबाई मालिकेचं नुकतंच शेवटचं शूटिंग देखील संपल आहे. मालिका काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अश्यातच सोहम साकारणारा अभिनेता अद्वैत दादरकरने त्याच्या सोशिअल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. चला तर पाहुयात तो काय म्हणतो…

adwait dararkar pic
adwait dararkar pic

” आयुष्यात पहिल्यांदा Negative Role. सगळेच अनुभव आले. प्रचंड Trolling,negative reactions.. बरोबर खूप कौतुक आणि प्रेम सुद्धा. दुष्ट माणूस स्वतः साठी कधीच दुष्ट नसतो. लोकांसाठी असतो. त्यामुळे मुद्दाम दुष्ट पणा play न करता..समाजाच्या दृष्टीने चुकीची मतं..तत्व आणि वागणं असलेला ‘माणूस’ करण्यावर भर दिला. I like being a villain. Villains are more exciting. Judd Nelson हे म्हणणं जास्त पटलं..खरंच माझ्या comfort zone च्या बाहेर जाऊन काम करता आलं..thank you so much. झी मराठी मला ही संधी दिल्या बद्दल. आपले सीन्स करणं सर्वात अवघड होतं माझ्यासाठी..कारण आपल्या संपूर्ण टीम मध्ये सर्वात चांगलं bonding आणि मैत्री तुझ्याशी झाली पण On screen ते दिसणं अपेक्षित नव्हतं..त्यामुळे तुझ्या बद्दल तिरस्कार द्वेष मत्सर आणणं हे ॲक्टर म्हणून challenging होतं..पण आपलं action reaction च tuning उत्तम जमलं म्हणून शक्य झालं ( लालितकलादर्श पणा जपून ठेव ) आपले जेवढे सीन्स झाले त्यात खूप मज्जा आली..सगळ्यांबद्दल बोलणं शक्य नाही मज्जा आली पण आम्हाला सहन केल्या बद्दल आणि तुमच्या मेहनती बद्दल खरंच thank you. अगंबाई सूनबाई च्या संपूर्ण टीम चे.मनापासून आभार शेवटचे काही भाग आता उरले आहेत नक्की पहा अगं बाई सूनबाई ८.३० वाजता झी मराठी वर.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *