हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या सिजनमध्ये शिव ठाकरे ला प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. शिवने मराठी बिग बॉसचा शो जिंकला म्हणून त्याला हिंदी बिग बॉसने आमंत्रित केले मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवला एकाकीपणा जाणवत होता, याची जाणीव स्वतः बिग बॉसला देखील झाली आणि म्हणूनच शिवला त्यांचं मन मोकळं करण्यासाठी कन्फेशन रूम मध्ये बोलावण्यात आलं. त्यावेळी मनातली खदखद शिवने व्यक्त करताना म्हटले की, ‘तूम्हि स्ट्रॉंग आहात म्हणून तुम्ही रडू शकत नाही पण जर कोणी आपलं असेल त्याला मनमोकळे पणानं बोलावं असं वाटत राहतं. आपली जवळची माणसं खूप आहेत पण ती आता घरी आहेत. या क्षणाला असं वाटतं की मी काही चुकीचं तर करत नाही ना? आज मला ते सगळं भरून आलं होतं. तुम्ही माझ्याबद्दल काळजीपोटी विचारलं म्हणून भरून आलं आणि माझ्या अश्रूंचा बांध फुटला’.

यावर बिग बॉस म्हणतात की, ‘तुला वाटतंय का की तू चुकीचं काही करतोयस ?’ त्यावर शिव म्हणतो की, कधी कधी असं वाटतं की हा मराठी बिग बॉसचा शो जिंकून आलाय म्हणून तो मोठी प्लॅनिंग करून आलाय . मी कोणासोबतही उभा राहिलो, त्याला मी दुखावू नये हाच माझा हेतू असतो . ह्या घरात मी मैत्रीला पहिलं प्राधान्य दिलं आहे, मी शालीनसोबत मैत्रीचा हात पुढे केला तरी लोकं असा विचार करतात की यामागेही शिवचा काही प्लॅन आहे. निम्रीत असो साजिद असो सगळ्यांसोबत मी मैत्री केली , ही माझी लोकं आहेत आणि त्यांना मी एकत्र राहून पुढे जायचंय हाच माझा हेतू होता. विकेंड वॉर मध्येही बऱ्याचवेळा माझं नाव आलं नाही तेव्हाही मला वाटायचं की मी चांगला खेळत नाही का? कैतुकाची एक थाप जरी मला मिळाली असती तर मला वाटलं असतं की हो मी योग्य खेळत आहे. मला ह्याबाबत तुम्हीच सांगा मी बरोबर आहे की चूक’. यावर बिग बॉस शिवला सहानुभूती देताना म्हणतात की, ‘कधी कधी आपण खूप स्ट्रॉंग असलो तरी अशा भावुक क्षणाला आपल्याला सामोरं जावं लागतं. आपल्या माणसाकडून एका मिठीची अपेक्षा असते. ह्यावर शिव साजिद, अब्दु ची नावं सुचवतो. परंतु ह्या व्यक्ती पहिल्या जशा वागत होत्या तशा मुळीच वागत नाहीत ते डोक्याने खेळतात असं शिव म्हणतो. मी मनापासून खेळतो त्यामुळे स्ट्रॉंग दिसण्यासाठी मी त्यांच्यासमोर रडूही शकत नाही. माझं हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार होण्यासाठी मी पहाटे चार चार वाजता उठलो आहे. मराठी बिग बॉस, रोडीज असो, मला हे स्वप्न सत्यात उत्तरवायचं आहे.

यावर बिग बॉस शिवला म्हणतात की जो व्यक्ती खरा आहे त्याची स्वप्नं सत्यात उतरतात, तू कसा आहेस हे लोकांना देखील माहीत आहे त्यामुळे तू मनापासून खेळत रहा यश नक्की मिळेल. शिवने बिग बॉससमोर आपलं मनमोकळं केलं. यावेळी शिवला एका पाठिंब्याची भक्कम आधाराची गरज आहे याची जाणीव एक्स गर्लफ्रेंड विणा जगतापला झाली. विणाने शिवला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘वाघ आहेस तू, hugssss… रडू नाही अजिबात, मी आहे सोबत नेहमी’… असे म्हणत वीणाने देखील शिवला पाठिंबा दर्शवला आहे. केवळ वीणाच नाही तर मेघा धाडे, डॉली बिंद्रा, रोडीज फेम रणविजय यासर्वानी शिवला स्ट्रॉंग म्हणत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. यात रोडीज फेम रणविजयने शिवसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात तो म्हणतो की, ‘ एकेकाळचा तू माझ्या गँगमधला..शिव ठाकरे. ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छितो शिव ठाकरे ला मी कसा ओळखतो. तो माझ्या रोडीजच्या गँगमध्ये होता .त्या प्रवासात आम्ही अनेक चढउतार एकत्र अनुभवले आणि तो नेहमी हसतमुख असायचा आणि खूप प्रामाणिक व मेहनती देखील होता. तो नेहमी आदर राखणारा आणि प्रेमळ राहिला आहे.. मी त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणासाठी शुभेच्छा देतो!’