
देवमाणूस मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती पण मालिका पुढे तशीच ओढून ताणून धरण्याने मालिकेवर अनेक जण टीका करताना पाहायला मिळाले. मालिकेच्या शेवटावरून देखील खूपच वाद झाले मालिकेचा आणखीन दुसरा भाग येणार कि काय अस वाटलं. मालिकेत विशेष लक्ष वेधलं ते मालिकेतील टोण्या आणि सरू आज्जीने. आता झी वाहिनीवर नवी मालिका मन झालं बाजींद ह्या मालिकेतील आजी म्हणजे फुई आज्जीने प्रेक्षकांना भुरळ घातलीय. पण तुम्हाला माहित आहे कि हि फुई आज्जी साकारणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? चला तर जाणून घेऊयात …

झी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली “मन झालं बाजींद ” हि मालिका आपल्या गावरान रांगड्या भाषेमुळे आणि मालिकेत सैराट चित्रपटातील अभिनेत्यांमुळे विशेष लक्षणीय ठरली आहे. मालिकेत वैभव चव्हाण आणि श्वेता खरात सोबत कल्याणी चौधरी, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख यासारखे कलाकार झळकताना पाहायला मिळतात. मालिकेत आणखीन एक पात्र सर्वांचे लक्ष वेधत आहे ते म्हणजे फुई आज्जी साकारणाऱ्या कल्पना सारंग ह्यांनी. कल्पना सारंग ह्यांना तुम्ही अनेक मराठी आणि हिंदी मालिकांत तसेच चित्रपटांत देखील पाहिलं असेल. रायजिंग स्टार या रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये रणवीर सिंग सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली याचसोबत अनेक जाहिरातीत देखील त्यांनी कामे केली आहेत. आगरी सिंघम आणि डॅम्बिस म्हातारी, झी मराठीवरील भागो मोहन प्यारे, द परफेक्शनिस्ट, इन्स्पेक्टर चिंगम अशा विविध माध्यमातून आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. कल्पना सारंग यांनी टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला होता. मन झालं बाजींद ह्या मालिकेमुळे पुन्हा त्या छोट्या पडद्यावर झळकताना पहाया मिळतायेत. मन झालं बाजींद मालिकेतील फुई आज्जी साकारणाऱ्या कल्पना सारंग ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…