Breaking News
Home / जरा हटके / आदेश आणि सुचित्रा कॉलेजमध्ये असताना लपून छपून भेटायचे जेव्हा सुचित्राच्या वडिलांना कळले तेव्हा

आदेश आणि सुचित्रा कॉलेजमध्ये असताना लपून छपून भेटायचे जेव्हा सुचित्राच्या वडिलांना कळले तेव्हा

झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे. येत्या २६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता महामिनिस्टर या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. ज्यात ११ लाखांची पैठणी मिळवण्याचा मान कोणत्या शहराला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या विविध शहरात जाऊन महमिनिस्टरचा कार्यक्रम करत होते. या प्रत्येक शहरातून एक विजेती ठरवण्यात आली असून आता या विजेत्यांना कुटुंबासह आमंत्रित करून त्यांचा परिचय करून दिला जात आहे. २५ तारखेपर्यंत या विजेत्या वहिनींना भाऊजी बोलतं करताना दिसणार आहेत.

aadesh and suchitra bandekar
aadesh and suchitra bandekar

काल कावेरी मात्रे या पुण्यातील विजेत्या वहिनींना मंचावर आमंत्रित केले होते त्यांच्यासोबत कुटुंबातील मंडळी या मंचावर हजेरी लावताना पाहायला मिळाली. या कुटुंबाशी गप्पा मारत असताना आदेश भाऊजींनी आपल्या कॉलेजचा एक किस्सा सांगितला होता. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा प्रेमविवाह आहे हे आता सर्वांनाच ठाऊक झाले आहे. सुचित्राची आई घरी नसताना आदेश बांदेकर यांनी सुचित्राला प्रपोज केले होते. त्यावेळी तू हो म्हणशील तर महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊ आणि नाही म्हणशील तर ही आपली शेवटची भेट असेल असे आदेश बांदेकर यांनी धाडस करत स्पष्ट केले होते. आता पुन्हा भेट होणार नाही या विचाराने सुचित्राने त्याक्षणी आपला होकार दिला होता. या होकारानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. सुचित्राचे आई वडील खूपच कडक शिस्तीचे होते त्यामुळे त्यांना कुठलीच खबर न लागू देता हे दोघे एकमेकांना भेटत असत. रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेजजवळ असलेल्या एका हॉटेलच्या पायरीवर हे दोघे बसले होते. त्यावेळी खबरदारी म्हणून दीपाली विचारे सह त्यांचे काही मित्र त्यांच्यासोबत होते.

aadesh bandekar family
aadesh bandekar family

आदेश आणि सुचित्रा हे दोघे तिथे बसलेत हे सुचित्राच्या वडिलांना समजले होते त्यावेळी या मित्रांनी ‘दादा आले’ असे म्हणताच आदेश बांदेकर यांनी तिथून पळ काढला होता. हॉटेलमध्ये असलेल्या फळीखालून जाऊन किचनमध्ये ते लपून बसले होते. तेवढ्यात तिथे एक वेटर कपडे बदलण्यासाठी आला होता. त्या वेटरकडचा ड्रेस आदेश बांदेकर यांनी घेतला आणि अंगात घालून बाहेर आले तर समोर सुचित्राचे वडील उभे होते. वेटरच्या त्या ड्रेसमुळेच आदेश बांदेकर त्यावेळी थोडक्यात बचावले होते अशी एक गोड आठवण त्यांनी या मंचावर करून दिली होती. अभिनेते आदेश बांदेकर हे सूत्रसंचालन करत मराठीत पाऊल टाकलं पुढे राजकारणात देखील ते सक्रिय असलेले पाहायला मिळाले. तर इकडे त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर हादेखील मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करताना आजही पाहायला मिळतात.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *