जरा हटके

गंभीर अपघाताची बातमी समजताच मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्रीची घेतली अशी दखल

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मणक्याला आणि उजव्या पायला देखील मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना हालचाल करणेही शक्य नव्हते. ही बातमी मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पसरली आणि थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पर्यंत जाऊन पोहोचली. संगीत, नाट्य आणि मालिका क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांचा त्यांना सहभाग पाहून त्यांची झालेली ही अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या अपघाताची दखल घेतली आहे. वर्षा दांदळे या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका देखील आहेत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिकला पाठवले.

actress varsha dandale pic
actress varsha dandale pic

किशोरी पेडणेकर यांनी नाशिकला जाऊन वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे आणि नव्या उमेदीने पुन्हा कला क्षेत्र सक्रिय होणार अशा शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतः वर्षा ताईंनी आपली दखल घेतली असल्याने मुख्यमंत्री आणि किशोरी पेडणेकर यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणतात की….”बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री श्रीमती वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समजताच त्यांनी श्रीमती वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांची नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली तसेच तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच पुन्हा आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद महापौर मॅडम, कलाकाराला तुमच्या राज्यात मान आहे प्रेम आहे शतशः प्रणाम…”

shivsena at actress varsha dandale home
shivsena at actress varsha dandale home

पेशाने संगीत शिक्षिका असलेल्या वर्षा दांदळे यांना काही नाटकांत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांचं नाटकांतील काम पाहून त्यांना मालिकेत सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संधीच त्यांनी सोनं केलं. नांदा सौख्य भरे या मालिकेतील वच्छी आत्या घराघरात पोहचली आणि या भूमिकेनंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. नकटीच्या लग्नाला यायचं ह ह्या मालिकेत लता काकुंची भूमिका साकारली. या मालिकेनंतर घाडगे अँड सून मालिकेत सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ साकारली. काही दिवसांपूर्वी “पाहिले ना मी तुला”या मालिकेतील उषा मावशी च हळवं रूप देखील प्रेक्षकांना खूपच भावलं. अपघातामुळे त्यांची परिस्थिती देखील खूपच नाजूक झाली असून त्या आता उपचार घेताना दिसतात. यामुळेच त्यांनी चाहत्यांना मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे असे म्हटले होते. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button