गेल्या काही दिवसांपासून हास्यजत्रा फेम वनिता खरात हिच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. आज २ फेब्रुवारी रोजी ही प्रतीक्षा आता संपलेली पाहायला मिळत आहे. वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाचा बार आज उडालेला आहे. यावेळी त्यांच्या लग्नाला हास्यजत्राच्या कलाकारांनी हजेरी लावून हा सोहळा अधिक रंगतदार बनवला. गेल्या दोन दिवसांपासून सुमित आणि वनीताचे लग्न होणार म्हणून त्यांची धावपळ सुरू होती. वनीताच्या मेहेंदी सोहळ्यात या कलाकारांनी नाचून धिंगाणा केला होता. वनिताने आपल्या लग्नात एक खास गोष्ट केली. पारंपरिक दागिन्यांची तिला भारी हौस आहे. आपल्या लग्नात सुद्धा असे दागिने घालता यावेत ही तिची इच्छा प्राजक्ता माळीने पूर्ण केली.

प्राजक्ताने नुकताच प्राजक्तराज या पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केलेला आहे. सोन्याचा मुलामा असलेले सोनसळा या कलेक्शनमधले काही खास दागिने प्राजक्ताने वनिताला भेट म्हणून दिले होते. वनिताने आपल्या लग्नाच्या चुड्यामध्ये प्राजक्ताने दिलेले गहू तोडे, पैलू पाटली, एकेरी मोती बांगडी घातले होते. यासोबतच बेल पानटिक, वज्रटिक, मोहनमाळ असे बरेचसे दागिने प्राजक्ताने वनिताला भेट म्हणून दिले . हे सर्व दागिने वनिता आपल्या लग्नात घालणार असे आश्वासन तिने प्राजक्ताला दिले होते. आज वनिताने तिच्या लग्नात हा सोनसळा दागिन्यांचा सेट घालून मिरवला होता. लोकडाऊन दरम्यान एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून वनिता आणि सुमितची भेट झाली होती. एकाच ग्रुपमध्ये असल्याने हे दोघेही अनेकदा आपल्या मित्रांसोबत ट्रिप एन्जॉय करायचे. याचदरम्यान दोघांची मैत्री झाली आणि त्याचे वर्षभरात प्रेमात रूपांतर झाले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातच या दोघांनी आता लग्न करायला हरकत नाही असा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही गोष्ट त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केली होती. तेव्हापासून वनिताच्या लग्नाची उत्सुकता तिच्या चाहत्याना लागून राहिली होती. आज २ फेब्रुवारी रोजी या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलेले पाहायला मिळत आहे.

त्यांच्या लग्नात पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, नम्रता संभेराव, ईशा डे, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट या कलाकारांनी हजेरी लावली होती. हास्यजत्रा सोबतच ही कलाकार मंडळी पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत सुद्धा एकत्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेलं आहे. वनीताचं लग्न म्हणून ही कलाकार मंडळी फारच उत्सुक झाली होती. वनिताच्या लग्नात ह्या सर्वानी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या हजेरीमुळे संपूर्ण वातावरण खेळीमेळीचं पाहायला मिळाल. वणीताचा लग्नातला लूक कसा असे याची उत्सुकता असतानाच तीच्या लग्नातले काही खास फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या फोटोंवर सेलिब्रिटींनी तसेच तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे. अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या या आयुष्याच्या ह्या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.