अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणतात आमच्या लग्नाचा २१ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता मी किचनमध्ये बिर्याणी बनवत होते

कित्येक वर्षाच्या सुखी संसारात लग्नाच्या वाढदिवशी असं काही खास सरप्राईज गिफ्ट मिळालं की मन आनंदून जातं. असाच एक खास अनुभव मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना आला आहे. काल म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी घरात बिर्याणी बनवण्याचा घाट घातला होता. या सर्व स्वयंपाकाच्या लगबगीत असतानाच त्यांच्या नवऱ्याकडून त्यांना एक सरप्राईज मिळालं. स्वयंपाकाचा बेत असल्यामुळे त्यांनी अंगावर ऍप्रन चढवला होता तशाच अवस्थेत त्यांच्या नवऱ्याने त्यांना पार्किंग लॉटमध्ये बोलावले. समोरच अभ्या असलेल्या नव्या कोऱ्या लाल रंगाच्या कारने त्यांचे लक्ष्य वेधून घेतले.

लाल रंगाची ‘ Kia Seltos ‘ या गाडीने वंदना गुप्ते यांचे लक्ष्य वेधून घेतलेले पाहायला मिळाले. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्याकडून आपल्याला असे काही खास सरप्राईज गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा न ठेवणाऱ्या वंदना गुप्ते यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टवर मराठी विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे तसेच त्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ह्या कारची किंमत तब्बल १४ लाख ते १८ लाखांच्या आसपास आहे. पती आपल्याला असं काही गिफ्ट देतील ह्याची वंदना गुप्ते ह्यांना कल्पना देखील नव्हती त्यांच्या ह्या गिफ्टमुळे त्या खूपच आनंदी झाल्या आहेत. अभिनेत्री वंदना गुप्ते २१ वर्षांपूर्वी पेशाने वकील असलेल्या शिरीष गुप्ते यांच्या सोबत विवाहबंधनात अडकल्या हा त्यांचा प्रेमविवाह होता. प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या त्या कन्या होत. वंदना गुप्ते या लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावाच्या परंतु मुलींचे पालनपोषण एकत्र कुटुंब पद्धतीत व्हावे असे त्यांच्या आईला वाटले म्हणून त्यांच्या आईने पुण्यात आजोळी शालेय शिक्षणासाठी पाठवले.

आपल्या आईमुळे गायनाची आवड वंदना गुप्ते यांच्यात शालेय जीवनापासूनच होती. एकदा गाण्याच्या कार्यक्रमात लावणी गाताना मनोरमा वागळे यांनी वंदनाला पाहिलं आणि तिथेच ‘ पद्मश्री धुंडिराज’ या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळवून दिली. त्यानंतर कमलाकर सोनटक्के यांच्या ‘जसमा ओडन’ या नाटकात काम मिळाले. हे नाटक पाहायला शिरीष गुप्ते तिथे आले होते. शिरीष गुप्ते त्यावेळी वकिलीचे शिक्षण घेत होते मात्र नाटक पाहायची विशेष आवड त्यांना होती. नाटकाच्या प्रयोगाला हजर राहिल्यावर लव्ह ऍट फर्स्ट साईट असे म्हणतात तसेच शिरीष गुप्ते यांच्याबाबत झाले. वंदनाला समोर पाहताच गिरीश गुप्ते वंदनाच्या प्रेमात पडले. एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यावर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्नही केले. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा..