डीआयडी शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली ही मराठमोळी लिटिल डान्स मास्टर आहे “वैष्णवी पाटील”. टेरेन्स, गीता कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि रेमो डिसुझा यांच्यासमवेत देशभरातील अनेक डान्सर्सनी DID लिटिल मास्टर्स या डान्स शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. त्यात पुण्याच्या वैष्णवी पाटीलनेदेखील आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षांपासूनच वैष्णवी पाटीलने नृत्याचे धडे गिरवले आहेत. बुगी वुगी, डीआयडी लिटिल मास्टर्स, इंडियाज गॉट टॅलेंट, नचले विथ सरोज अँड टेरेन्स, पोगो अमेझिंग किड्स अवॉर्डस अशा अनेक शोमधून तिने कधी फर्स्ट रनरअप चा मान पटकावला आहे.

तर कधी शोचे विजेतेपद जिंकले आहे. सुपर डान्सर, डान्स के सुपरस्टार्स, दम दमा दम अशा डान्स शोमध्येही तिने सहभागी होऊन विविध फॉर्ममधून नृत्याची अदाकारी सादर केली आहे. वैष्णवीचे बालपण पुण्यातच गेले नूतन मराठी विद्यालय तसेच मॉडर्न कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात बहीण गिरीजाच्या मदतीने तिने स्वतःची “KALARPINI” नावाने डान्स अकॅडमी सुरू केली आहे. नृत्याची तिची सेवा आजही अखंडपणे चालूच आहे. मधल्या काळात तिने मिका सिंग यांच्या पंजाबी भाषिक डान्स व्हिडिओत नृत्य सादर केले होते. तर काही हिंदी म्युजिक व्हिडिओत तिने नृत्य सादर केले मात्र पहिल्यांदाच ती आता मराठी म्युजिक व्हिडीओ अल्बम मधून झळकताना दिसणार आहे. चेतन गरुड प्रॉडक्शन्स प्रस्तुत “तुला पाहून जरा..” या मराठी गाण्यातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे गाणं युट्युबवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. शिवाय झी वाहिनीने नुकत्याच लॉंच केलेल्या झी वाजवा या म्युजिक चॅनलवर देखील हे गाणं पाहायला मिळत आहे.

वैष्णवी प्रथमच मराठी गाण्यात झळकत असल्याने ही बाब तिच्यासाठी मोठी आनंदाची ठरत आहे. ७ जून रोजी रिलीज झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओत वैष्णवी सोबत अक्षय कारडे हा कलाकार झळकताना दिसत आहे. अक्षय कारडे हा देखील उत्कृष्ट डान्सर असून त्याची स्वतःची डान्स अकॅडमी आहे. या डान्सची कोरिओग्राफी देखील अक्षयनेच साकारली आहे. वैष्णविला या व्हिडिओमुळे मराठी सृष्टीतही ओळख मिळणार आहे हे तिच्यासाठी मोठ्या कौतुकाची बाब ठरत आहे. वैष्णविला तिच्या या पहिल्या वहिल्या मराठी म्युजिक व्हिडिओसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!!…