हेमांगी कवी नंतर या अभिनेत्रीला प्रेग्नन्सी वरून केलं जातंय ट्रोल ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. त्यात काहींना तिचे म्हणणे अगदी योग्य वाटले तर काहींनी तिला ट्रोल करण्यातच धन्यता मानली. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असे म्हणणाऱ्या महिला असोत वा पुरुषांनी तिच्या विचारांना दिलेला पाठिंबा असो या सर्वच चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून चांगल्याच रंगलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच आता अभिनेत्री “उर्मिला निंबाळकर” हिनेही ट्रोल होत असल्याचे पाहून एक संयमी प्रतिक्रिया देऊन या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री “उर्मिला निंबाळकर” सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर लवकरच आई होणार आहे. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करताना ट्रोल होत आहे. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे रोहित राऊत सोबत सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी तिने प्राप्त केली आहे. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिलाने सुकीर्त गुमस्ते यांच्यासोबत लग्न केले. उर्मिला नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. शॉपिंग कशी करावी, साडी कशी नसावी, कपडे कोणते घालावे या फॅशन सेन्सबाबत ती नेहमीच संवाद साधताना दिसायची. सध्या उर्मिला प्रेग्नन्ट आहे आणि काहीच दिवसात ती आई देखील होणार आहे. उर्मिला नेहमीच आपल्या इन्स्टाग्रामवरून स्वतःचे फोटो शेअर करत असते परंतु यातून तिला महिला वर्गाकडूनच ट्रोल करण्यात येत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून ती ह्या ट्रोलिंगला सहन करत आहे. परंतु नुकतेच तिने एक पोस्ट शेअर करून आपल्या आयुष्यात आलेल्या या सुंदर क्षणाची आठवण कॅमेऱ्यात कैद केली जावी आणि त्या क्षणाचा आनंद लुटावा एवढंच त्यामागचा हेतू असावा असे तिने म्हटले आहे पाहुयात ती आपल्या पोस्टमध्ये नेमकी काय म्हणाली ते…

‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’ ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’? ‘कोणाला काय पोटं येत नाहीत का? मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्यात स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या, या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा ९ वा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे .