उर्मिला मातोंडकर, आमिर खान आणि जॅकी श्रॉफ अभिनित रंगीला हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटामध्ये उर्मिला आणि जॅकी श्रॉफ या दोघांनीही आपल्या अभिनयाला पूर्ण पने न्याय दिला होता. या दोघांचा अभिनय पाहून त्यावेळी या चित्रपटासाठी तिकीटबारवर मोठी गर्दी उफाळून आली होती. चित्रपटात असलेल्या उर्मिलाचा मादक अंदाज आणि चित्रपटाची कथा तसेच गाणी यांमुळे चित्रपट खूप गाजला. चित्रपटातील उर्मिलाची मेहनत त्यावेळी आपण सर्वांनीच पहिली, मात्र या चित्रपटामागे अस ही एक सत्य दडलेल आहे ज्याचा खुलासा उर्मिलाने नुकतच एका मुलाखतीत केला आहे.

उर्मिलाने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने काही गोष्टींचा उलगडा करत असं म्हटलं आहे की, “मी एका सामान्य कुटुंबातून आले आहे. त्याआधी माझा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. मला सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करावं लागलं. कारण माझं आडनाव खूप मोठं नव्हतं. माझा तो ४ वर्षांचा काळ फारच कठीण होता. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असे चढ उतार येत असतात. तसेच माझ्या आउष्यात देखील आले.” पुढे उर्मीलाने त्याकाळी असलेल्या पत्रकारितेवर देखील भाष्य केलं. ती म्हणाली की, “त्या काळचा मीडिया देखील खूप वाईट होता. माझ्या बद्दल नेहमी वाईट गोष्टी छापल्या जायच्या. रंगीला चित्रपटात मी केलेला अभिनय आणि माझं काम सर्वांनीच पाहिलं आहे. पण त्यावेळी माझ्या कामाचं कोणीही कौतुक केलं नव्हतं. मी चित्रपटात एक मादक भूमिका साकारली बास एवढंच सर्वांना दिसत होतं. माझ्यातील कलाकाराला त्यावेळी अजिबात न्याय मिळाला नव्हता पण त्याच जागी जर दुसरी एखादी प्रसिद्ध अभिनेत्री किंवा एखाद्या कलाकाराची मुलगी असती तर तिचं सर्वानी कौतुक केलं असत. नेहमी प्रसिद्ध व्यक्तींनाच प्रसिद्धी मिळते नवोदित कलाकारांना त्यावेळी खूप डावललं जायचं.

चित्रपटात तेव्हा माझ्या लुकवर देखील कोणी चांगली कमेंट केली नाही.चित्रपट मोठा हिट झाला होता. मात्र यामध्ये माझं काहीच योगदान नसल्याचं सर्व जन म्हणायचे.” उर्मिलाने या सिनेसृष्टीत आजवर अनेक चित्रपट केले आहेत. यातील बरेचसे चित्रपट सुपरहिट देखील ठरले आहे. उर्मिला सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी सतत काही ना काही पोस्ट शेअर करते. सध्या ती सिनेमापासून दूर असली तरी देखील सोशल मीडियावर ती प्रेक्षकांच्या सेवेत नेहमीच हजर राहते. उर्मिलाने बाल कलारांच्या देखील भूमिका साकारल्या आहे. अगदी बाल पणापासून अभिनय आणि रंगीला चित्रपटातील तिचा अभिनय खरोखरच वाखरण्या जोगा आहे. मात्र तरी देखील कोणीही तिला पुरस्कार प्रदान केलेला नाही. याची तिला खंत वाटते. तिच्या प्रमाणेच अनेक कलाकार देखील न्यायासाठी अन्यायाविरुद्ध बोलले आहेत पण काही दिवसांनी हे सगळं काही धुळीत मिळत असा अनुभव यापूर्वी देखील कित्येकांना आला आहे.