मराठी बिग बॉसच्या घरातून तेजस्विनी लोणारी हिने एक्झिट घेतली आहे. टास्क दरम्यान काळजी न घेतल्याने तेजस्विनीचा हात फ्रॅक्चर झाला होता..यादरम्यान ती काही दिवस तशीच घरात वावरताना दिसली. मात्र ही दुखापत अधिक वाढल्याने तेजस्विनीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले. तेव्हा ही दुखापत किरकोळ नसून काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. यानंतर बिग बॉसच्या आदेशानुसार तेजस्वीनीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. खरं तेजस्विनीने आपल्या खिलाडू वृत्तीने बीग बॉसच्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता कोण असेल तर ती तेजस्विनी असेल असे मत अनेकांनी जाहीर केले होते. मात्र चौथ्या सिजनची पहिली फायनलिस्ट मानलेल्या प्रेक्षकांना तिचे बिग बॉसच्या घरातून असे जाणे मुळीच मान्य नव्हते. तिला बिग बॉसने पुन्हा बोलवावे त्याशिवाय आम्ही हा शो पाहणार नाही असा पवित्रा तिच्या चाहत्यांनी घेतला होता. तिला पुन्हा बोलवावे अशीही मागणी करण्यात येत आहे.

अनेकांनी तिला सिक्रेट रुम मध्ये ठेवलं आहे असेही म्हंटले होते मात्र काही काही वेळापूर्वीच तेजस्विनी तिच्या राहत्या घरी पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तेजस्विनीला हॉटेलमध्ये नेण्यात आले. तिथल्या स्टाफने तिला बाहेर आलेले पाहून आश्चर्य व्यक्त केले तिच्या तब्येतीची देखील अपुलकीने चौकशी केली. एवढेच नाही तर हे सर्व जण तिच्यासमोर रडायलाही लागले. ज्या ड्रायव्हरने तेजस्विनीला घरी नेऊन सोडले तो ड्रायव्हर देखील तुम्ही फायनलमध्ये हवे होतात असे कंठ दाटून येत तिला वारंवार सांगत होता. दुसऱ्या दिवशी तेजस्विनी डॉक्टरांकडे पुन्हा एकदा चेकअप साठी गेली. तिथेच पायाला फ्रॅक्चर झालेले आजोबा होते. त्यांनी तेजस्विनीला अजून चार आठवडे तू तिथे राहायला हवे होते अशी इच्छा व्यक्त केली. माझा पाय देवाने लवकर बरा नाही केला तरी चालेल पण तेजस्विनीचा हात लवकर बरा होवो अशी इच्छा त्यांनी मागितली. डॉक्टरांनी तेजस्विनीची दुखापत पाहिली तेव्हा ही दुखापत साधी नसल्याचे त्यांनी तिला सांगितले. अशा पध्दतीची दुखापत ही कुस्ती किंवा धरपकड करणाऱ्या खेळात होते असे त्यांनी तिला सांगितले. परंतु तेजस्विनीने याबाबत सावधगिरी बाळगली नाही म्हणूनच तिची ही दुखापत लवकर बरी होणार नाही असे त्यांनी सुचवले. त्यानंतर तेजस्विनी घरी गेली तेव्हा तिचे आई वडील तिला पाहून अतिशय शांत होते..

एरवी काही जरी खरचटलं तरी काळजी करणारे तिचे आईबाबा एकदम शांत दिसले कारण त्यांना माहीत होतं आपल्या पेक्षाही तेजुवर प्रेम करणारी माणसे आज तेजु सोबत आहेत. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून तेजस्विनी म्हणते की , ‘तुमचे आभार मी कधीच मानणार नाही कारण तुमच्या प्रेमाची उतराई नाही करायची मला , मी आभार मानायचे असेल तर बिग बॉसचे मानेन कारण त्यांच्यामुळे मला माझी माणसं मिळाली. तुमच्या ह्या प्रेमाच्या ताकदीवर लवकर बरे तर होणारच आहे मी, पण अधिक मेहनतीने तुमच्या मनोरंजनासाठी सुद्धा सज्ज व्हायचं आहे. शेवटी एकच सांगेन …हाथ टुटा है…हौसला नहीं …लवकरच भेटू’. अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचे बिगबॉसमुळे अनेक चाहते झाले आहेत. अनेक प्रेक्षकांनी त्याच्या जाण्याने बिगबॉसवर रोष व्यक्त केला आहे. पण आता ती पुन्हा येणार असं देखील अनेकांनी म्हटलं आहे. अभिनेता रणवीर ने देखील तेजस्विनीला सपोर्ट दर्शवला आहे. एकूणच पाहता ती खूपच स्ट्रॉंग कन्टेस्टंट होती.