तेजश्री प्रधान बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालेली दिसली. चाहत्यांचे प्रेम आणि त्यांच्या शुभेच्छा आपल्याला कायम प्रोत्साहन देत असतात म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडियापासून दूर असलेली तेजश्री पुन्हा एकदा सक्रिय झालेली दिसली. अग्गबाई सासूबाई मालिकेतून आशुतोष पत्की आणि तेजश्रीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती त्यामुळे चाहत्यांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. तर आशुतोषने देखील तेजश्रीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे तुझ्या हातात नव्हतं त्या मागील सर्व गोष्टी विसरून जा आणि नव्याने जग अशा स्वरूपाचा एक मेसेज देऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

आशुतोषने दिलेल्या या शुभेच्छावरून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत की काय असेच चित्र गेल्या काही दिवसांपासून मीडियावर रंगवले गेले. मात्र या नात्याचा उलगडा तेजश्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून स्पष्ट केला आहे. आमच्या दोघांमध्ये केवळ मैत्रीचे नाते आहे असे नुकतेच तेजश्रीने म्हटले आहे. आशुतोष आणि मी केवळ चांगले मित्र आहोत मैत्रिपलीकडे आमच्यात काहीही नाही असे तिने या मुलाखतीत सांगितले आहे. यासोबतच या मुलाखतीत तिने आपल्या लग्नाबाबतही एक वक्तव्य केले आहे. तेजश्री लग्न कधी करणार? याबाबत सांगताना म्हणते की, ” मला खरंच लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचं आहे. पुढच्या सहा महिन्यात जर मला कोणी मुलगा आवडलाच तर मी लगेचच त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होईल. अगोदर त्याने मला लग्नासाठी विचारायला हवं अशी अट तेजश्रीने घातली असून तो मुलगा सिने क्षेत्रातला असला तरी मला आवडेल फक्त एकच आहे की त्याने मला समजून घ्यायला हवं… मी ज्या क्षेत्रात काम करते त्या कामाला त्याने पाठिंबा द्यायला हवा.

मी ज्याच्याशी लग्न करणार तो मुलगा समजूतदार आणि तितकाच जबाबदारीने वागायला हवा अशी एक अपेक्षा आहे. ” तेजश्रीच्या लग्नाबाबतच्या या अपेक्षा फार काही नसल्या तरी त्या संसार थाटण्याच्या दृष्टीने अगदी योग्य आणि माफकच आहेत असे म्हणावे लागेल. येत्या काही दिवसात तिच्या अपेक्षा पूर्ण करणारा योग्य जोडीदार मिळाल्यास ती लवकरच लग्न करणार आणि आपला संसार थाटणार असे म्हणत आहे. सध्या ती कुठली मालिका किंवा चित्रपट साकारत नसली तरी सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या भेटीला येणार असे तिने सांगितले आहे. तुर्तास तेजश्रीने व्यक्त केलेल्या लग्नाबाबतच्या अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होवोत आणि लवकरात लवकर तिला एखादी छानशी मालिका मिळोत हीच सदिच्छा!!!