माझा होशील ना मालिकेतून अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी माघार घेत त्या स्टार प्रवाह वरील सांग तू आहेस का? मालिकेत काम करताना दिसतायेत . असंभव, कुंकू, असे हे कन्यादान, धुरळा, कदाचित, अग्निहोत्र, चार दिवस सासूचे, अवंतिका, ‘तेरी भी चूप मेरी भी चूप, श्रीमान श्रीमती अशा हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातून अभिनेत्री “सुलेखा तळवलकर” यांनी आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. विरोधी भूमिका असो वा नायिका, सह नायिकेच्या भूमिका त्या त्यांनी आपल्या अभिनयातून तितक्याच नेटाने सांभाळल्या.

सांग तू आहेस का या मालिकेत त्या सध्या अभिनय साकारत आहेत. झी मराठीच्या माझा होशील ना मालिकेतून त्यांनी काही काळ सईच्या आईची भूमिका साकारली होती. रुईया कॉलेजमध्ये असताना नाट्यवलय या नाट्यसंस्थेशी त्या जोडल्या गेल्या होत्या इथूनच रंगभूमीशी त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. नाटक मालिकेतून काम करत असताना अंबर तळवलकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. दिवंगत अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या त्या सून आहेत अंबर तळवलकर हा त्यांचाच मुलगा. सुलेखा आणि अंबर तळवलकर यांना आर्य आणि टिया ही दोन अपत्ये. टियाला ज्वेलरी डिझायनिंग करण्याची आवड आहे याशिवाय वेगवेगळ्या रेसिपीज बनवणे तिला खूप आवडते. आपली आई सुलेखा तळवलकर यांच्यासोबत ती त्यांच्या नावाने सुरू असलेल्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करताना दिसते. त्यांच्या या व्हीडीओजना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळतो आहे. टिया दिसायलाही खूपच सुंदर आहे. तळवलकर ग्रुप्सचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहेत त्यांची जबाबदारी देखील ती सांभाळताना दिसते. टिया आपली आज्जी स्मिता तळवलकर आणि आई सुलेखा यांच्या प्रमाणे अभिनय क्षेत्रात उतरली नसली तरी एका वेगळ्या क्षेत्रातून ती आपले करिअर घडवू पाहत आहे.

टियाने नुकत्याच एका सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला आहे आणि या पहिल्याच स्पर्धेत तिने प्रथम स्थानापर्यत मजल मारली आहे. नुकत्याच झालेल्या “मिस दादर” २०२१ स्पर्धेमध्ये टियाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ही सौंदर्य स्पर्धा तिने जिंकली असल्याने सुलेखा तळवलकर यांना खूप आनंद झाला आहे. आपल्या लेकीचे हे कौतुक पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय हा आनंद त्यांनी इन्स्टाग्रामवरून त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करून सांगितला आहे. टियाचे हे यश मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात येण्यास नक्कीच कामी येईल याबाबत शंका नाही या यशाबद्दल टियाचे मनापासून खूप खुप अभिनंदन!!!….