नुकतीच 21 जुन पासून कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका सुरू झाली आहे. जीव माझा गुंतला असे ह्या मालिकेचे नाव आहे. ह्या मालिकेत अकडू स्वभावाचा मल्हार आणि मनमिळाऊ स्वभावाची अंतरा यांची प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. पण खलनायक असल्याशिवाय ती प्रेम कहाणी बघण्यास मजा येत नाही. तसच काहीस ह्या मालिकेत दिसून येत आहे. अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर ही ह्या मालिकेत एक खलनायिका असल्याचे दिसत आहे. प्रतीक्षा मुणगेकर ही ह्या मालिकेत मल्हार ची काकू ही भूमिका साकारत आहे.

पण ती या आधी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ह्या मालिकेत काम करताना दिसत होती.दिव्या नावाच पात्र ती ह्या मालिकेत साकारत होती. मात्र तिने ती मालिका सोडली आणि आता ती जीव माझा गुंतला ह्या मालिकेत काम करताना दिसत आहे. मुल गी झाली हो ही मालिका सोडताना आणि नव्या मालिकेत काम सुरू करताना प्रतीक्षा ने तिच्या प्रेक्षकांना ह्या बद्दल सांगितल होत. मुलगी झाली हो ही मालिका सोडताना ती म्हणाली होती की ” नमस्कार आता पर्यंत आपण माझ्या मुलगी झाली हो ह्या मालिकेतील दिव्या ह्या भूमिकेसाठी भरभरून प्रतिसाद दिलात, प्रचंड प्रेम दिले, यासाठी मी आपली मनापासून आभारी आहे. तुमच्या शुभेच्छा ह्या नेहमी माझ्या पाठीशी असतातच. या पुढेही माझ्यावरचं तुमचं प्रेम असच राहुद्यात. भेटूया लवकरच.” अशा शब्दात प्रतीक्षा ने आपल्या प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण जीव माझा गुंतला ह्या मालिकेत एन्ट्री करताना तीने पुन्हा एकदा तिचा फोटो पोस्ट करून त्याखाली ” म्हणाले होते ना, भेटूया लवकरच” असे कॅप्शन देखील दिले आहे.

तिच्या ह्या नवीन भूमिकेसाठी तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रतीक्षा तिच्या नवीन मालिकेत चित्रा नावाच्या खलनायिकेच पात्र साकारत आहे. तर आता ती खलनायिका म्हणून मल्हार च्या आयुष्यात कोणत वादळ आणणार हे बघण नक्कीच उत्सुकतेच ठरणार आहे. प्रतीक्षा तीन वर्षांनी पुन्हा एकदा कलर्स मराठी वाहिनीवर बघायला मिळणार आहे. या आधी ती कलर्स वाहिनीवरील घाडगे आणि सून ह्या मालिकेत कियारा नावाची भूमिका साकारताना दिसली होती. त्या नंतर मात्र ती कलर्स वाहिनीवर दिसली नाही. पण आता पुन्हा एकदा ती तिच्या नवीन भूमिकेसाठी सज्ज झाली आहे.